बोटोणा येथे येथे कबड्डी स्पर्धा.मध्ये बेल्हारा संघाने मारली बाजी…

0

कारंजा घा./ तालुक्यातील बोटोणा (पारडी)येथे संत कमळगिर महाराज क्रीडा मंडळातर्फे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात बेल्हारा (तांडा)यांनी दणदणीत विजय प्राप्त करीत प्रथम क्रमांक तर व्दितीय बक्षिस दहेगाव (मुस्तफा)तर तृतीय बक्षिस कमळगिर महाराज क्रीडा मंडळ बोटोणा संघाने प्राप्त केले.बोटोणा येथे दोन दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन संत कमळगिर महाराज क्रीडा मंडळा तर्फे करण्यात आले होते.आ. दादाराव केचे यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.दोन दिवस चाललेल्या या सामन्यात तब्बल तिस संघाने सहभाग घेतला होता.अंतीम फेरीत बेल्हारा (तांडा)हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.प्रथम पारितोषिक शिल्प व सात हजार रूपये देण्यात आले.व्दितीय क्रमांक दरेगाव (मुस्तफा) संघाला रोख पांच हजार व शिल्ड तर तृतीय बक्षिस बोटोणा संघाला तिन हजार रूपये रोख देण्यात आले.बक्षिस वितरण बोटोणा गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.बोटोणा गांव जंगलविरहीत व ग्रामीण असुन येथिल युवकांनी स्पर्धा घेण्याचे धाडस करून स्पर्धा यशस्वी करून दाखविल्या.स्पर्धे करीता गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, असुन युवकांचे भरभरून कौतुक होत आहे.

 चैताली गोमासे साहसिक न्यूज /24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!