भरधाव ट्रॅव्हलरची टिप्परला जबर धडक, १४ भाविक जखमी, चालक ट्रॅव्हलरमध्ये अडकला 

0

🔥भरधाव ट्रॅव्हलरची टिप्परला जबर धडक, १४ भाविक जखमी, चालक ट्रॅव्हलरमध्ये अडकला 🔥रमणा फाट्यावरील भारतीय ढाब्यासमोरील घटना

सेलू -/ बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गावरील तालुक्यातील रमणा फाटा येथील भारतीय ढाब्यासमोर आज शुक्रवारी दुपारी दिड वाजता भरधाव ट्रॅव्हलर आणि टिप्परची भीषण धडक झाली. गुजरात राज्यातील भाविकांचा जत्था भंडारा जिल्ह्यातील मौदा येथून नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे दर्शनासाठी जात होता. दरम्यान भाविकांच्या ट्रॅव्हलर क्रमांक DD-03-W-9666 ने पुढे जात असलेल्या टिप्परला मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह १४ भाविक जखमी झाले असून जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व शासकीय रुग्णालय वर्धा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील वडद येथील एकूण २२ भाविक ट्रॅव्हलरने माहूर येथे दर्शनासाठी जात होते. रमणा फाटा येथील भारतीय ढाब्यासमोर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हलरने पुढे चाललेल्या JH 05 TC 1851 क्रमांकाच्या टिप्परला पाठीमागून जोरदार धडक दिली. टिप्पर हा जमशेदपूर येथून गुजरातच्या गांधीबागला जात होता. दरम्यान डिझेल भरून वळण घेत असताना हा अपघात घडला. ही धडक एवढी जबरदस्त होती की ट्रॅव्हलरचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी होत गाडीतच अडकून पडला होता. त्याला मोठया प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. अपघातात ट्रॅव्हलरमधील १४ प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली.अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून स्थानिक नागरिक तसेच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांच्या मदतीने बचावकार्य राबविले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय सेलू, सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व शासकीय रुग्णालय वर्धा येथे हलविण्यात आले. यातील सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.अपघातात जखमींची नावे अपघातात राखीपाल पाटील (४५), साया मक्षी गोंड (३), राजुदेव रावते (३७), तेजल रशीदभाई भारत (१८), हिना तुळशे डोनमाल्या (२४), सुरेश रावते (३५), प्रवीण जानू कहात (४१), हर्षदा ईश्वर कहात (२७), गंगाबाई ईश्वर कहात (४७), जमशेत रतन खलनायक (५६), रामू रामजीभाई रावत (४५), प्रकाशभाई गुणाभाई वाधवा (३६), रोमा निलेश थोरात (३५) आणि सुमित्रा बल्लू वरखन (४०) यांचा समावेश आहे. सर्व जखमी गुजरात राज्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.या अपघाताचा पुढील तपास सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरंजन वरभे, मंगेश राऊत, सुनील चावरे, जमादार जावेद धामिया आदी करीत आहेत.

            ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 सेलू वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!