भाजपाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांना चिंतन करण्याची वेळ, भाजपाच्या तालुकाध्यक्षा च्या गावात तूतारिला भरगच्च लीड…

0

 भिडी -/ नूकत्याच झालेल्या सन.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नवख्या,अपरिचीत असलेल्या खासदार अमर काळे ला भिडी या सर्कल मधूनच भरभराट आघाडी मिळत गेली त्यातही भिडी हे भाजपा तालूका अध्यक्षांचे गाव याच गावात तूतारि या चिन्हाला भरगच्च मतांची लिड मिळाल्याने व परिचित असलेले व दोन वेळा खासदार राहिलेले माजी खासदार रामदास तडस यांना येथे यावेळी लिड का ? नाही मिळाली त्यातही मिळालेली मते ही अती अल्प का ?हे भाजपाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांना चिंतन करण्याची वेळ आली आहे.तर भिडी येथे भाजपा पक्ष कार्यकर्ते कसे व त्यांचे कार्य काय हे मात्र भाजपाच्या जिल्हा कमेटिने तपासलेच नाही त्यामूळेच येथे भाजपा उमेदवाराला लिड मिळाली नाही.असा हि सूर गावक-यातून निघत आहे
देवळी तालूक्यातील दूस-या नंबर वर असलेली भिडी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जात आहे हे काॅग्रेसच्या स्वर्गिय प्रभाताई राव ,तसेच लोकप्रिय म्हणून प्रख्यात असलेले आमदार रणजीत कांबळे यांचे भिडी ‌हे घर आगंन आहे असे ही संबोधले जाते
भिडी ग्रामपंचायत कार्यकाळ पाहीला तर बरेच वर्ष काॅग्रेसचेच वर्चस्व राहीले सन २००९ चा कार्यकाय त्यातही राष्ट्रवादी तून निघून ग्रामपंचायतीच्या उप पदा करिता भाजपाचा हात थांबलेल्या एका कार्यकर्त्या ने जम बसवून हा गावांचा विकास सोडून खाबूगिरीतच गेला
सन .२०१४ सरपंच राखिव आल्याने खाबूगिरीत उस्तांद असलेल्या त्या कार्यकर्ताचे भाग्यंच उजाडले हा कार्यकाळ ग्रा.पं. चा ” सांग पाटला काय करू ” यात पाटिलच गडिगप्प झाला.
सन.२०१९ मध्ये ग्रामस्थांनी खाबूगिरी करणा-याला चांगलीच चपराक देवून नविनच यूवकाला भरगंच्च बहूमत देवून ग्रा.पं. हाती दिली तेव्हापासून तर आजपर्यंत गावाच्या विकासाला चालना मिळाली गावांचा कायापालट झाला याला आमदार रणजीत कांबळे यांचे मोलाचे श्रेय मिळाले असल्याने गाव स्वच्छं व सूदंर झाले
अस्या गावाच्या विकासाला महत्त्व न देना-या खाबूगिरीवर व स्वार्थ बाळगना-या कार्यकर्त्यांची भाजपाने निवड केल्याने च भिडी सर्कल मध्ये भाजपाच्या उमेदवाराला पिछ्याडिवर राहावे लागले
झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तालुकाध्यक्षा च्या गावात पडलेले मतदान भाजपाचे रामदास तडस यांना ४६७ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे १२७८मते मिळाली ,काळे हे ८११ मतांनी आघाडी घेतली
अस्या पक्षांच्या तालूका अध्यक्षांचे पद भोगना-या च्या गावात पक्षांच्या उमेदवाराला अती अल्प मते मिळने म्हनजे लाजिरवाणी गोष्ट आहे
यावर भाजपाच्या जिल्हा कमेटिने चिंतन करण्याची वेळ आली आहे.

राजू वाटाणे साहसिक न्यूज -/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!