भारतात चौथ्या लाटेला सुरुवात?…एका व्यक्तीपासून दोघे बाधित
वुत्तसंस्था / नवी दिल्ली :
तज्ज्ञांनी सांगितलं आहे. देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिल रोजी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.
पॉझिटीव्हिटी रेट देखील ४.८२ टक्क्यांपर्यंत वाढला
१० फेब्रुवारी २०२२ नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ५२ अधिक रुग्ण नोंदवले गेले. दिल्लीत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा ३,७०५ वर पोहोचली आहेत, हा आकडा १३ फेब्रुवारीपासूनचा सर्वाधिक आकडा आहे. पॉझिटीव्हिटी रेट देखील ४.८२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतांची संख्या २६,१६६ वर पोहोचली आहे. चौथ्या लाटेच्या घोषणेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. लोकांमधील विषाणूंविरूद्ध प्रतिकारशक्तीची स्थिती आम्हाला अद्याप माहित नाही. जानेवारीतील तिसऱ्या लाटेत बाधित झालेल्या लोकांना पुन्हा संसर्ग होत आहे की नाही हे देखील माहित नाही, असं आयआयटी मद्रासचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जयंत झा म्हणाले. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात दिल्लीतून घेतलेल्या बहुतेक नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे उप-प्रकार BA.2.12 आढळून आले आहेत. राजधानीतील रुग्णसंख्येची वाढ होण्यामागे हा प्रकार असू शकतो.