🔥सुमित वानखेडेंच्या प्रयत्नाने आर्वी विधानसभा क्षेत्रात ५२६ घरकुल मंजूर.
🔥विमुक्त जाती व भटक्या जमातींना सुमित वानखेडें मुळे मिळणार हक्काचे पक्के घर.
आर्वी -/मतदारसंघातील माझ्या मातृभूमीतील नागरीकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. मतदारसंघाच्या दुर्गम, दुर्लक्षित भागातील तसेच लाभ क्षेत्रातील लोकांच्या गरजा, समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. याचच एक भाग म्हणून विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे प्रतिनिधी मंडळ त्यांचे पक्के घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने माझ्याकडे आले होते. त्यांनी मला त्या संदर्भात निवेदन दिले होते. शासन दरबारी निवेदन कर्त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने गाव निहाय शासनाने सर्व्हे केला होता. शासनाच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून दिल्यानंतर आष्टी व कारंजा तालुक्यातील तब्बल 526 यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता बंजारा, गवळी व भोई समाज म्हणजे विमुक्त जाती व भटक्या जमातींना आता त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे अशी माहिती सुमित वानखेडे यांनी देत याबाबत आनंद व्यक्त केला.आर्वी मतदारसंघात सुमित वानखेडे सक्रिय झाल्यापासून नागरिकांच्या वर्षोनुवर्षे प्रलंबित मुलभूत सुविधांसह अनेक विकासात्मक कामे होतांना दिसत आहेत. यापैकी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत सन 2024-25 करीता कार्योत्तर मान्यता व निधी प्रती लाभार्थी रु.1.20 लक्ष प्रमाणे रु.6,31,20,000 /-(अक्षरी रुपये सहा कोटी एकतीस लक्ष वीस हजार फक्त) व 4 टक्के प्रशासकीय निधी (प्रती घरकुल रु. 4800 /- प्रमाणे)रु.25,24,800/- (अक्षरी रुपये पंचवीस लक्ष चोवीस हजार आठशे फक्त) अशा एकूण रु. 6,56,44,800 /- (अक्षरी रुपये सहा कोटी छप्पन्न लक्ष चौवेचाळीस हजार अठशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून 1 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. यामुळे आर्वी आष्टी व कारंजा तालुक्यातील बंजारा, गवळी व भोई समाजाला याचा फायदा होईल अशी अधिक माहिती सुमित वानखेडे यांनी दिली आहे.