मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा..

0

 देवळी / येथील श्री बी. के. समाजकार्य महाविद्यालय यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य माधवी दुर्वे, प्रमुख पाहुणे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्र निलेश घिये, तसेच प्रा. आशिष ढगे प्रा.प्रीती दिगंबर डॉक्टर रमेश नगराळे , प्रा.वैशाली तापकिरे प्रा. अर्चना बारंगे, प्रा. वैशाली ठाकरे, मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. माधुरी आंबटकर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. माधुरी आंबटकर यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी भाषेची महती विशद केली रसेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. निलेश घिये यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मराठीतूनच बोलावे लागेल विविध अभ्यासक्रम मराठीतून शिकावे लागेल असे आपल्या भाषणामध्ये सांगितले प्रा.आशिष ढगे यांनी मराठीचे महत्त्व विशद केले शेवटी अध्यक्ष भाषणामध्ये प्राचार्य माधवी दुर्वे यांनी मराठीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रीती दिगंबर यांनी तर आभार डॉक्टर नगराळे सर यांनी मानले.

 सागर झोरे साहसिक न्यूज /24 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!