“महाराष्ट्राने सकारात्मकतेचा, विकासाचा आणि विश्वासाचा आधारस्तंभ गमावला.” – माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख.

0

🔥“महाराष्ट्राने सकारात्मकतेचा, विकासाचा आणि विश्वासाचा आधारस्तंभ गमावला.” – माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख.

🔥अजित दादाच्या अकस्मात निधनाने महाराष्ट्र ची पोकळी कधीच भरून निघणार नाही, मान्यवरांनी केली शोक संवेदना व्यक्त, समीर देशमुख यांचे डोळे पाणावले.

वर्धा -/ महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने युवा नेते समीर देशमुख यांच्या पुढाकाराने नालवाडी स्थित व्ही.आय.पी. मार्गावरील महात्मा सभागृहात येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने विकासाभिमुख, कर्तृत्ववान आणि सर्वसामान्य जनतेचा खंबीर आधार असलेला नेता गमावला असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्याचा गौरव करत दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली.
या शोकसभेचे प्रास्ताविक समीर देशमुख यांनी केले. शोक सभेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी आजीतदादाच्या आठवनी सांगितल्या. शिखर बँकेचे अध्यक्ष ते विदर्भ पाटबंधारे महामंडळ उपाध्यक्ष अश्या महत्वाच्या पदावर आजीतदादाचे मोलाचे सहकार्य मला लाभले. दादांनी जिव्हाळा चे नाते जपत प्रतेक वेळेस सहकार्य केले, असे म्हणत ते भावूक झाले. या प्रसंगी शेखर शेंडे (माजी सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी), डॉ. अशोक पावडे (ज्येष्ठ विधिज्ञ तज्ञ), संजय गाते (भाजप जिल्हाध्यक्ष), मनोज चांदुरकर (काँग्रेस जिल्हाध्यक्ष), आशिष पांडे (शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख), राजेश सराफ (शिवसेना (शिंदे) जिल्हा प्रमुख), शरद सहारे (राष्ट्रवादी (अजित पवार) जिल्हाध्यक्ष), मनोहर पंचारिया (जनता दल (सेक्युलर) जिल्हाध्यक्ष), यशवंत झाडे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिल्हा प्रमुख), अभ्युदय मेघे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव), सुनिल राऊत (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार माजी जिल्हाध्यक्ष), प्रवीण हिवरे (माजी सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी), राजेंद्र शर्मा (ज्येष्ठ काँग्रेस नेते), प्रमोद भोमले (शिवसेना (उबाठा) जिल्हा उपप्रमुख), शरयु वांदिले (माजी महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी श.प.), शैलेंद्र झाडे (शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी श.प.), निरज गुजर (निर्माण सोशल फोरम अध्यक्ष), प्रा. खलील खतीब (राष्ट्रवादी श.प. जिल्हा उपाध्यक्ष), रामू पवार (राष्ट्रवादी श.प. सेलू तालुका अध्यक्ष), निलेश खोंड (राष्ट्रवादी अ.प. शहर अध्यक्ष), गुणवंत डकरे (सत्यशोधक समाज अध्यक्ष), नंदकुमार वानखेडे (कामगार संघटना सरचिटणीस), अनिता ढोबळे (राष्ट्रवादी श.प.) तसेच प्रमोद खोडे (शिक्षक संघटना) या मान्यवरांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्यात. शोकसभेचे संचालन प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी केले. तर शोकसभेला निलेश किटे, कन्हैया छांगानी, संदेश किटे, अतुल वघळे, दिवाकर मुन, दिलीप गावंडे, संदिप किटे, निलेश पोहेकर, गिरीश काशीकर, बाळासाहेब इंगोले, अर्चीत निघडे, उत्कृष्ट देशमुख, मोहन हांडे, प्रणय कदम, रवि संगतानी, मयुर डफरे, संदिप राऊत, मिलिंद हिवलेकर, विनय डहाके, घनश्याम डाखोळे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!