महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे राज्यव्यापी आंदोलन
प्रतिनिधि/सागर राऊत
महाराष्ट्र राज्य महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे एक दिवशीय लक्षणीय राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले..
महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी अदा करावा , सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावे ,10. 20 व 30 वर्षाच्या सेवेनंतरची तीन लाभाची योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पाच दिवसाचा आठवडा लागू करावा अकृषी विद्यापीठांमधील उर्वरित 796 पदाचा सातवा वेतन आयोगाचा सुधारित वेतन सरचनेचा शासन निर्णय निर्गमित करावा
यासह इतरही घेऊन आदोलन करण्यात आले.. आदोलनात
यशवंत महाविद्यालयाचे कर्मचारी प्रभुदास सोनवणे, मारूती मसराम, किशोर धुर्वे, उत्तम राऊत, विनोद तेलंग, बाबुराव सोनवणे, सुरेश पुसम यासह शिक्षण उपस्थित होते…