🔥महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी : डॉ. श्रद्धा पंकज चोरे,🔥महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ने समतेच तिळगुळ कार्यक्रमातून दिली समाजाला नविन दिशा.
वर्धा -/ आजच्या तांत्रिक व धकाधकीच्या जीवनात महिला घरातील सर्वांची काळजी घेतात पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष करतात प्रत्येक महिलेने स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे कारण तीच स्वास्थ चांगल असेल तरच ती घराला चांगल्या प्रकारे ठेवू शकते. घरातल्या प्रत्येक सदस्याची काळजी घेणे हे जसं तिचं काम आहे तसंच स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. चाळीशी नंतर तर महिलांनी स्वतःला जपायलाच हवं. कुठलातरी एक व्यायाम रोज करा कुठलाही एक खेळ खेळा, खेळायला वयाचे बंधन नाही हे लक्षात असू द्या. स्वतः आनंदी राहण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा एक दुसरीला मदत करत आपण सगळ्यांनी पुढे जाऊ. अशा प्रकारची मांडणी डॉ श्रध्दा पंकज चोरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना केले
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने विधवा, परित्यक्ता,प्रोढ कुमारिका, निपुत्रिक महिला यांच्या साठी वर्धा वर्धन हाट झुनका भाकर केन्द्राचे सभागृहात समतेचं तिळगुळ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 24 जानेवारीला दुपारी करण्यात आले होते यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी मा रजनी सुरकार,पंकज युवनाते,शहाणाझ पठाण,अश्विनीचा चहांदे, व्दारकाताई ईमडवार डॉ. श्रद्धा पंकज चोरे प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय तसेच कार्यक्रमाची भूमिका मांडताना डॉ. माधुरी झाडे म्हणाल्या की, दीडशे वर्षांपूर्वी सुरू केलेला समतेच हळदीकुंकू सावित्रीबाईंनी अत्यंत घातक रूढी,प्रथा, परंपरांना तडा देण्यासाठी केलेलं होतं. सुहासिनी महिलांनाच फक्त तिळगुळ हळदीकुंकू करण्याचा मान आपल्या समाजामध्ये होता तेव्हा आपण समाजातल्या बहुतांश महिलांकडे दुर्लक्ष करतो व त्यांना हीन लेखतो असं त्यांना वाटत होत. याकरिताच सावित्रीबाईं फुलेंनी सर्व जाती-धर्माच्या महिलांसाठी तसेच विधवा, पुनर्विवाह ,परितक्ता, प्रौढकुमारी , निपुत्रिक महिला या सर्वांसाठी समतेच तिळगुळ 13 जानेवारी 1852 ला आयोजित केलं होतं. आजही समाजामध्ये फारशी परिस्थिती बदलली आपल्याला आजही दिसत नाही. विधवा महिलांना तर हळदी कुंकाला तिळगुळाच्या कार्यक्रमाला महिलाच महिलांना बोलवत नाही. काही प्रमाणात परिस्थिती बदललेली असली तरी ती अजूनही सुरूच आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा चुकीच्या घातक रूढीं,परंपरा यांना सुद्धा अंधश्रद्धा समजते कारण वैज्ञानिक दृष्टिकोनावर ती योग्य ठरत नाही आणि म्हणूनच आज समतेचा तिळगुळ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.अशी मांडणी त्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्वारकाताई इमडवार महिला विभाग कार्यवाह वर्धा जिल्हा यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही समतेची लेकरं मारू अन्यायाला ठोकरं या गीताने केली या गीताचे सादरीकरण देवयानी तुरक्याल, अदिती धोपटे, स्नेहल थोटे, कोमल चौधरी, प्राची काकडे यांनी केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उद्घाटन पाण्याचा दिवा पेटवून शहनाझ पठाणताई यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष रजनी सूरकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन ही सातत्याने होऊन सर्व प्रकारच्या महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे आणि म्हणूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा कार्यक्रमाचे आयोजन करते. आपणही नेहमी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा असं आव्हाहनही त्यांनी केलं. मनोहर तुकारामजी ढोमणे ज्वेलर्स यांच्याकडून या कार्यक्रमाकरिता सर्व महिलांसाठी पर्स आणि खेळाच्या माध्यमातून गिफ्ट भेट देण्यात आले. त्यांच्याकडून प्रतीक युवनाते व अश्विनीचा चहांदे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेऊन महिलांचे चांगल्या प्रकारे मनोरंजन केले. गेम मध्ये प्रथम येणाऱ्या महिलांना एमटीडी ज्वेलर्स कडून भेट दिल्या गेलं, सर्व महिलांना पर्स देऊन त्यांनी महिलांचा सन्मान केला. याच कार्यक्रमांमध्ये दरवर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या भरारी शिबिराविषयी सारिका डेहनकर कविता राठोड यांनी माहिती देऊन शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण भोसले, प्रधान सचिव भरत कोकावार, डॉ. हरीश पेटकर आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनीअर्स, शिक्षक, प्राध्यापक पासून तर घरकाम करणाऱ्यापर्यंत सर्व प्रकारच्या महिला एकाच वेळी कार्यक्रमात उपस्थित होत्या. हे या कार्यक्रमाचं विशेष होतं. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना सातव फुसाटे हिने केले. जिल्ह्याच्या महिला सहकार्यवाह कविता लोहट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. डॉ. मंजुषा देशमुख यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता डॉ. माधुरी झाडे यांनी केली.