आष्टी शहीद -/येथुन नजीकच असलेल्या लहान आर्वी येथील ग्रामपंचायतची माहे आॅगस्ट महीण्याची महीला ग्रामसभा बस स्टॅण्डवरील सुवर्ण मंगल कार्यालयात नुकतीच पार पडली.ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सुनील साबळे होते.तर मंचावर उपसरपंच अमोल होले, ग्रामसेविका अनुराधा धारपुरे, ग्रामपंचायत सदस्य सागर नागापुरे,ज्योती गायकी, कुसुम सरदार, सोनाली राऊत, रेश्मा माथने तसेच अंगणवाडी सेविका शोभा निमकर्डे (देशमुख),मोनाली बुरनासे (गायकी), कल्पना कुथे,आशा स्वयंसेविका मंगला भिवापुरे,आशा डेहनकर , शिल्पा होले आणि उमेद प्रेरीका वनिता साबळे,पुनम राऊत,निलीमा देशमुख, कृषी सखी रेखा आकोलकर उपस्थित होत्या.राज्यगिताने ग्रामसभेला सुरवात करून मागील जानेवारी महीन्यातील महीला ग्रामसभेचे इतीव्रुत्त वाचन करण्यात आले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची माहिती देऊन लहान आर्वी आणि लिंगापुर येथील महीलांनी सादर केलेल्या अर्जांची यादीचे वाचन यावेळी करण्यात आले.ग्रामसभेत महीलांच्या समस्यांवर बोलताना सरपंच सुनिल साबळे यांनी ग्रामपंचायतचे करवसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी सहकार्य करा.महीलांच्या सहकार्याशिवाय गावाचा विकास शक्य नाही असे सांगितले.महीला सकक्षमीकरण विषयावर बोलताना गावाचा शाश्वत आराखडा करताना महीला हा प्रमुख घटक असल्याचे सरपंच सुनील साबळे यांनी सांगितले.यावेळी ग्रामसेविका अनुराधा धारपुरे आणि उमेद प्रेरीका निलीमा देशमुख यांनी महीला सक्षमीकरण यावर महीलांना उचित मार्गदर्शन केले.राष्ट्रगिताने महीला ग्रामसभेची सांगता झाली.यावेळी बचत गट ग्रामसंघाचे अध्यक्षा ज्योती उज्जनकर, कविता वाठोकर यांच्या सह १८७ महीलांची ग्रामसभेला उपस्थिती होती.