माणूस जगला किती हे महत्वाचे नसून कसा जगला हे महत्वाचे आहे : सुधीर पांगुळ….

0

🔥माणूस जगला किती हे महत्वाचे नसून कसा जगला हे महत्वाचे आहे : सुधीर पांगुळ.

वर्धा -/ मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. राजकारणात आणि समाज कार्यात जर समतोल निर्माण करायचा असेल तर मनाला प्रसन्न आणि शांत ठेवणे आवश्यक आहे आणि ती शांती आपल्याला ब्रह्माकुमारीमध्ये शिकविल्या जाणाऱ्या ध्याना मधून प्राप्त होते असे व्यक्तव्य वर्धा जिल्हा चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळ यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पवनार येथे 90 वी त्रिमुर्ति शिव जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमामध्ये केले. या कार्यक्रमाला माजी खासदार माननीय सुरेश भाऊ वाघमारे, नालवाडी ग्रामपंचायत सरपंच्या प्रतिभा ताई माऊस्कर, इवोनिथ कंपनी चे प्रमुख आर. के. शर्मा, ज्येष्ठ पत्रकार विनोद भाऊ चोरडिया, ज्येष्ठ समाज सेवक मोहन भाऊ अग्रवाल, प्रदीप भाऊ बजाज, लक्ष्मी नारायण मंदिर चे अध्यक्ष अनुराग भाऊ बजाज, लायन्स क्लब गांधी सिटीचे अनिल नरेडी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मिलिंद भाऊ भेंडे, मा. संदीप चिचाटेजी, वर्धा सेवाकेंद्र संचालिका माधुरी दीदी इत्यादी महानुभाव उपस्थित होते.
महाशिवरात्रिचा दिवस परमात्म्याची आठवण करून देणारा खास दिवस आहे या दिवशी सर्वांनी शिव परमात्म्याच्या सानिध्यात राहिले पाहिजे असे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रह्माकुमारी माधुरी दीदी यांनी महाशिवरात्री चे विशेष महत्त्व व रहस्य सांगताना केले. पुढे त्या म्हणाल्या की, खऱ्या ईश्वराला ओळखण्यासाठी पाच कसोट्या आहे. ईश्वर हा सर्व धर्ममान्य, सर्व शक्तीमान, सर्वज्ञ, सर्वगुण संपन्न अपरिवर्तनशील असतो. सयाजी महाराज मार्गदर्शन करताना म्हणाले की, आज मला महाशिवरात्रीचे खरे महत्त्व काय आहे हे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया मधे येऊन कळले इथे कुठल्याच प्रकारचा धर्मभेद नाही आहे, आपण जरी वेगवेगळे असलो तरी तत्व एकच आहे असे म्हणत त्यांनी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा. सुरेश भाऊ वाघमारे, मोहन भाऊ अग्रवाल, विनोद भाऊ चोरडिया यांनी सर्व उपस्थितांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मधु दिदि यांनी शब्द सुमनाने उपस्थितांचे स्वागत करुण विद्यालयाचा परिचय दिला.
साची झिल्पे, अनुश्री खंगार, सानवी, जानवी रनदेरीया यांनी शिवचरित्रवर नृत्य सादर केले. मिलिंद भाऊ भेंडे आणि सानिका बोभाटे यांनी शिवस्मृती गीत प्रस्तुत केले. या कार्यक्रमाच्या संचालन करिता बी. के. अपर्णा दीदी यांनी विशेष सहकार्य केले, दर्शना दीदी यांनी सर्व अतिथींचे व उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट मेडिटेशन द्वारे करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्याने विशेष 12 ज्योतिर्लिंगाची आकर्षक झाँकी सजविण्यात आली, याचा लाभ सर्व भाविक भक्तानी घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता किशोर भाई, हेमंत भाई, पंकज देवडे, किशोर भाई, मनीष सहारे,अविनाश भाई, स्वप्नील भाई, रेणुदीदी, नूतन दीदी तृप्तीदिदि, स्नेहा दिदि इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!