वणी -/ येथे १० फेब्रुवारी रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) यवतमाळ जिल्हा कौंसिलची बैठक दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मारेगाव येथील पक्ष कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य कौंसिलर गुलाबराव उमरतकर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य कौंसिलर अनिल हेपट आणि हिम्मतराव पाटमासे उपस्थित होते.बैठकीत जिल्हासचिव अनिल घाटे यांनी राज्याचा अहवाल सादर करत जिल्ह्यातील सभासद नोंदणीचा आढावा घेतला. विविध तालुक्यातील प्रतिनिधींनी आतापर्यंत झालेल्या सभासद नोंदणीचा अहवाल जिल्ह्याकडे सुपूर्द केला. उर्वरित सभासद नोंदणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे ठरले. तसेच, २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील जुन्या व नवीन पक्ष शाखा परिषदा पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने एप्रिल महिन्यात वणी येथे राज्यव्यापी कापूस उत्पादक परिषद आयोजित करण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, पांढरकवडा, बाभुळगाव, यवतमाळ, पुसद, दिग्रस आणि नेर या तालुक्यातील जिल्हा कौंसिलर उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सहसचिव बंडू गोलर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा सहसचिव संजय भालेराव यांनी मानले.