मोहन अग्रवाल शास्त्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणार….

0

🔥मोहन अग्रवाल शास्त्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणार.

देवळी -/  येथील ज्येष्ठ समाजसेवी व उद्योजक मोहनबाबु अग्रवाल गेल्या ५० वर्षा पासून सक्रिय समाजसेवेशी जुडलेले आहे. त्यांनी आपल्या सामाजिक जीवनात रोग निदान शिबीरे, वालीबॉल व कबड्डीचे राज्य स्तरिय सामने, वादविवाद व चित्रकला, स्पर्धा व्याख्यानमाला, अंध-व अपंगासाठी किराणा किटचे वितरण गोरगरीब व शालेय मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण, कवि सम्मेलन आदी अनेक समाजाभिमुक कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक सेवेसाठी अनेक सामाजिक संघटनेनी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.

दिनांक १९ जून रोजी सकाळी ११ वाजता ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम तर्फे श्याम सुंदर मन्नालाल अग्रवाल धर्मशाळेच्या सभागृहात मोहन अग्रवाल यांना शास्त्री जीवन गौरव पुरस्कार-2025 ने सन्मानित करणात येत आहे.

हा पुरस्कार त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या हस्ते दिला जाणार आहे. या प्रसंगी एन. सी.सी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, लॉयन्स क्लबचे माजी अध्यक्ष विजय सत्यम, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, चैन्नाई येथील ज्येष्ठ साहित्यकार इश्वर करुण, शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिलकुमार दक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, राष्ट्रीय महासचिव अबुबकर खान, लक्ष्मीनारायण चड्डा, राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, इंद्रजीत लोणारे, माजी प्रदेश अध्यक्ष विजय नाखले. युवा नेता संतोष तुरक, गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन मोहिते, सिहान उल्हास वाघ, मंगेश भोंगाडे, आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन फोरमचे प्रदेश अध्यक्ष अॅड. इब्राहीम बख्श आजाद, विदर्भ प्रदेश महिला अध्यक्ष कविता हिंगणकर, रमेश बडोदेकर, दिनेश शिरभाते, माजी जिल्हाध्यक्ष विनोद बंब आदीने केले आहे.

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!