यवतमाळ विमेन्स प्रीमियर लीग सीझन १ चा भव्य समारोप….तेजस्विनी संघाने पटकावला मानाचा चषक…

0

🔥यवतमाळ विमेन्स प्रीमियर लीग सीझन १ चा भव्य समारोप….तेजस्विनी संघाने पटकावला मानाचा चषक 

यवतमाळ -/ येथे स्कूल ऑफ स्कॉलर्स विद्यालय द्वारा आयोजित करण्यात आलेल्या यवतमाळ विमेन्स प्रीमियर लीग – सीझन १ या महिला क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध संघांनी उत्साहाने सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सौ. गौरी अशोकराव थोरात – कलर्स मराठी वाहिनीवरील तुळजाभवानी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री यांची उपस्थिती लाभली. अंतिम सामन्यात खेळाडूंनी जिद्द, चिकाटी आणि संघभावनेचे उत्तम दर्शन घडवले.अंतिम फेरीमध्ये तेजस्विनी व पिंक क्विन्स संघाने बाजी मारली. अत्यंत रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात तेजस्विनी या संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले, तर पिंक क्विन्स या संघाने उपविजेतेपद मिळवले. विजेत्या संघाला मानाचा चषक व 11000 रुपये रकमचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

तसेच उपविजेत्या संघाला 9000 रुपये रकमेचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.या सामान्यांमध्ये तब्बल दहा संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यातील मालिकावीर म्हणून पिंक क्विन्स संघाची खेळाडू प्रतिभा जाधव तसेच सामानवीर म्हणून तर तेजस्विनी संघाची प्रांजली ठाकरे या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रीना काळे, उपमुख्याध्यापिका जागृती गंडेचा, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे, क्रीडा विभाग प्रमुख श्री. संजय कोल्हे, पंकज शेलोटकर तसेच पंच म्हणून जबाबदारी सांभाळणारे श्री.राजू टेंभरे, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, क्रिकेटप्रेमी, प्रेक्षकांचे मोठे सहकार्य लाभले. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा यवतमाळ जिल्ह्यातील महिला खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याचे मोठे व्यासपीठ ठरली.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवर, खेळाडू आणि प्रेक्षकांचे आभार मानत पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या उत्साहात आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!