यवतमाळचा अभिमान! कमी वयात यश किशोर चव्हाणने मिळवले राष्ट्रीय पेटंट,तंत्रज्ञान क्षेत्रात ठसा उमटवला….!

0

यवतमाळ -/ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अभिमानास्पद यश प्राप्त करत AUTOMATED GUIDED HOME CARE AUTONOMOUS ROBOT या नावाने पेटंट मिळाल्याची आनंददायक बातमी समोर आली आहे.घरगुती देखभाल क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या या अभिनव रोबोटिक प्रणालीमुळे आरोग्य सेवा अधिक सुलभ,कार्यक्षम आणि सुरक्षित होणार आहे.या उल्लेखनीय यशात यवतमाळच्या यश किशोर चव्हाण याने कमी वयात मोठे यश मिळवत आपल्या कर्तृत्वाची ठसा उमठवला आहे.यामुळे यवतमाळ जिल्ह्याचा गौरव संपूर्ण देशभरात उंचावला आहे.या प्रगत रोबोट डिझाईनमागील मुख्य संशोधक व निर्माते:डॉ.मीनाक्षी अनुराग थालोर,डॉ.वीणा सुहास भेंडे,डॉ.अमिता अनिरुद्ध शिंदे,डॉ. रियाझअहमद जमादार,यश किशोर चव्हाण,अमेय अनंत सावंत आहेत.पेटंट चा अर्ज 3 जून 2024 या रोजी करण्यात आला होता.प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक संशोधकाने आपले कौशल्य,ज्ञान आणि मेहनत यांचे उत्तम उदाहरण घडवले आहे.विशेषतः यश किशोर चव्हाण याने कमी वयात हे यश मिळवून तरुण पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.या रोबोटिक प्रणालीचा मुख्य उद्देश म्हणजे घरगुती देखभाल करणाऱ्या लोकांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मदत करणे.वृद्ध,दिव्यांग किंवा गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची दैनंदिन काळजी घेणे,औषधांची आठवण करणे,तापमान व इतर आरोग्यविषयक तपासणी करणे यासाठी हा रोबोट उपयुक्त ठरणार आहे.संशोधकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजासाठी एक प्रभावी उपाय शोधून काढला आहे.या अभिनव संकल्पनेमुळे वैद्यकीय सेवा क्षेत्रात नवी दिशा निर्माण होईल.या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण टीमचे आणि विशेषतः यवतमाळच्या यश किशोर चव्हाण याचे मनःपूर्वक अभिनंदन! हा प्रकल्प भविष्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी बनवेल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नवा आदर्श निर्माण करेल.

दीपक यंगड साहसिक NEWS-/24 यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!