“रस्ता सुरू…पण फलक गायब!”निधी कुठला ? खर्च किती ? ठेकेदार कोण ? – वानाडोंगरी नगर परिषदेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह…

0

🔥“रस्ता सुरू…पण फलक गायब!”निधी कुठला ? खर्च किती ? ठेकेदार कोण ? – वानाडोंगरी नगर परिषदेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

हिंगणा -/ हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी नगर परिषद अंतर्गत अष्टविनायक नगर ते बोदिले ले-आऊट (प्रभाग क्रमांक १) येथे सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी कामाच्या सुरुवातीपासूनच एक गंभीर बाब समोर आली आहे—कामाच्या ठिकाणी माहिती फलक (Information Board) कुठेच दिसत नाही !
रस्ता बनतोय, मशीनरी चालू आहे, मजूर काम करतायत… पण नागरिकांना निधीचा स्रोत, खर्च, ठेकेदार, वर्क ऑर्डर क्रमांक, इंजिनियर, मुदत अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने जागरूक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, सार्वजनिक निधीतून होणाऱ्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावणे बंधनकारक असून त्यावर कामाचा अंदाजपत्रक, निधीचा स्रोत, ठेकेदाराचे नाव, कामाची मुदत आणि जबाबदार अधिकारी यांची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र, येथे फलकच नसल्याने नागरिकांनी “फलक नाही म्हणजे पारदर्शकता नाही” असा थेट आरोप केला आहे.
*नागरिकांचा संशय वाढतोय*…
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, फलक नसल्यामुळे पुढील प्रश्नांना उत्तरच मिळत नाही—

हे काम कुठल्या निधीतून मंजूर आहे ?
एकूण खर्च किती ?
ठेकेदार कोण ?
वर्क ऑर्डर नंबर काय ?
जबाबदार इंजिनियर कोण ?
कामाची मुदत व गुणवत्तेची तपासणी कोण करणार ?
नागरिकांनी असा संशयही व्यक्त केला की, जिथे पारदर्शकता नसते तिथेच बिलांमध्ये फुगवटा, निकृष्ट दर्जा, बनावट मोजमाप यांसारख्या बाबींना खतपाणी मिळते.

“🔥काम करा… पण माहिती लपवू नका!”
रस्त्याचे काम सुरू झाल्याचा आनंद असला तरी, नागरिकांचा सूर स्पष्ट आहे—
“काम करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे, पण कामाची माहिती लपवणं हा अधिकार नाही !”
विशेष म्हणजे, परिसरात नगर परिषदेत एकूण मोठ्या निधीच्या कामांची चर्चा (सुमारे ९० कोटी रुपये ) सुरू असतानाच अशा प्रकारे फलकांशिवाय काम सुरू असल्याने जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचे बोलले जात आहे.
🔥मुख्याधिकाऱ्यांकडे थेट मागणी
या प्रकरणी नागरिकांचे लक्ष आता थेट मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्याकडे लागले आहे. नागरिकांची ठाम मागणी आहे की—
🔥कामाच्या ठिकाणी तात्काळ माहिती फलक लावावा
वर्क ऑर्डर, मंजुरी पत्र, खर्चाची रक्कम, निधीचा स्रोत जाहीर करावा,
ठेकेदाराचे नाव स्पष्ट करावे,
तज्ज्ञ इंजिनियरमार्फत गुणवत्तेची तपासणी करावी,
निकृष्ट दर्जा आढळल्यास थेट कारवाई करावी,
नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क क्रमांक द्यावा,

🔥फलक नाही तर तक्रार निश्चित!” – नागरिक आक्रमक

स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की,
“जर प्रशासनाने स्पष्ट माहिती दिली नाही, तर आम्ही लोकायुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच आरटीआय अंतर्गत माहिती मागवून सत्य बाहेर काढू !”
निष्कर्ष विकासकाम हा आनंदाचा विषय असतो… पण जर विकासाच्या नावाखाली माहिती लपवली जात असेल, तर जनता शांत बसणार नाही.
आज प्रश्न फक्त रस्त्याचा नाही—
तो आहे पारदर्शकतेचा, जबाबदारीचा आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा!
नगर परिषद प्रशासनाने तातडीने खुलासा केला नाही, तर हे प्रकरण आंदोलन आणि उच्चस्तरीय चौकशीपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गजानन ढाकुलकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!