🔥राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.श्री अजितदादा पवार सह …पदाधिकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
🔥सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचे वतीने श्रद्धांजली चा कार्यक्रम संपन्न.
हिंगणघाट -/दिनांक २७ जानेवारी रोजी बारामती जवळ विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार मुंबई पोलिस दलाचे पोलिस अंमलदार विदीप जाधव पायलट कॅप्टन सुमित कपुर,सह पायलट कॅप्टन शांभवी पाठक , फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा दुर्दैवी अंत झाला त्या सर्वांच्या मृतात्म्यास शांती मिळण्यास सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी संस्थेचे वतीने श्रध्दांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला सर्वांनी दोन मिनिटे मौन धारण करून मृतात्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज दिनांक ३० जानेवारी रोजी पुण्यतिथी असल्याने पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्रध्दांजली वाहण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अरुणराव झोटिंग, रमेश पोहाणे , गणेश खडतकर, विनोद पा.राऊत , चंद्रशेखर रोहनकर,राजुभाऊ दहिलकर, नामदेवराव किटे,संजय कापसे, शंकरराव भलावे, विजयसिंह बैस, कैलास अतकरणे, विनोद सु.राऊत, धर्मपाल जवादे,रामा परगणे,जागेश्र्वर मिश्रा, सुरेंद्र कोहळे,संजय कापसे, सुभाष कोसुरकर, श्रीकृष्ण हिवराळे, प्रकाश भोयर, अनिल मोहोड,सुहास जुमडे, गजानन सातपुते इत्यादी बांधव उपस्थित होते.