🔥हाच तो रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट कथित घोटाळा: माजी अध्यक्ष आशिष सोमण यांच्याकडून पुराव्यांची मांडणी🔥हाच तो मुख्य सूत्रधार अतुल महाजन यांच्या घरासमोर ठेवीदारांचा ठिय्या
प्रतिनिधी यवतमाळ -/ रावसाहेब पटवर्धन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील बहुचर्चित कथित घोटाळा प्रकरणाला आज नाट्यमय वळण मिळाले. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात बोलावण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान माजी अध्यक्ष आशिष सोमण यांनी ठोस कागदपत्रांसह हजेरी लावून वस्तुस्थिती मांडली. इतर संचालकांनी पाठ फिरवल्याने आणि सादर कागदपत्रांवरून घोटाळ्याचे मूळ सूत्रधार संचालक अतुल रामदास महाजन असल्याचे उघड झाल्याने संतप्त ठेवीदारांनी थेट महाजन यांच्या निवासस्थानावर मोर्चा वळवला. अखेर दोन तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर अतुल महाजन यांनी ठेवी परत करण्याची लेखी व तोंडी जबाबदारी स्वीकारल्याने तणाव निवळला.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेटच्या कथित गैरव्यवहाराबाबत संबंधित सर्व आजी-माजी संचालकांना आज, बुधवारी प्रत्यक्ष बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रशासकीय व्यस्ततेमुळे उपनिबंधक कार्यालयाकडून या प्रकरणाची पुढील तारीख निश्चित करण्यात आली.
सुनावणी लांबणीवर पडली असली, तरी संस्थेचे माजी अध्यक्ष आशिष सोमण हे स्वतः उपनिबंधक कार्यालयात उपस्थित झाले. कार्यालयाच्या आवारात मोठ्या संख्येने जमलेल्या ठेवीदारांना त्यांनी सामोरे जात संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समजावून सांगितली.
सोमण यांनी ठेवीदारांसमोर संस्थेचे अंतर्गत व्यवहार, तक्रारींशी संबंधित मूळ दस्तऐवज आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे उघड केली. संस्थेत गैरव्यवहार नेमका कुणी आणि कसा केला, संचालकांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून अध्यक्ष म्हणून आपली दिशाभूल कशी केली, याचा संपूर्ण ताळेबंद त्यांनी पुराव्यानिशी मांडला. ही कागदपत्रे पाहिल्यानंतर आशिष सोमण यांचा या कथित घोटाळ्यात थेट सहभाग नसून त्यांचीही फसवणूक झाल्याचे ठेवीदारांच्या लक्षात आले. त्यामुळे सोमण यांच्याबद्दल ठेवीदारांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला.
🔥(ह्याच त्या कीर्ती महाजन) या बैठकीसाठी उपनिबंधक कार्यालयाने संस्थेचे इतर संचालक कीर्ती महाजन, सचिन बनकर, अश्विनी बनकर, अनिल बांद्रे, रुपेश येडे यांच्यासह अन्य संचालकांनाही नोटीस बजावून बोलावले होते.(हेच ते सचिन बनकर) मात्र, माजी अध्यक्ष आशिष सोमण हे सर्व पुराव्यानिशी उपस्थित राहणार असल्याची कुणकुण लागताच या सर्व संचालकांनी सुनावणीस गैरहजर राहणे पसंत केले. संचालकांच्या या पळपुटेपणामुळे उपस्थित ठेवीदारांचा संशय अधिकच बळावला. (हेच ते अनिल विठ्ठल बांद्रे) कागदपत्रांची तपासणी आणि आशिष सोमण यांच्या खुलाशानंतर या संपूर्ण गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार संचालक अतुल रामदास महाजन हाच असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ठेवीदारांनी आपला मोर्चा उपनिबंधक कार्यालयाकडून थेट अतुल महाजन यांच्या निवासस्थानाकडे वळवला. महाजन सुरुवातीला घरी उपस्थित नसल्याचे पाहून संतप्त ठेवीदारांनी त्यांच्या कुटुंबीयांना जाब विचारत घरासमोर ठिय्या मांडला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून अखेर अतुल महाजन यांना घरी बोलावण्यात आले.महाजन निवासस्थानी पोहोचल्यानंतर ठेवीदार आणि अतुल महाजन यांच्यात तब्बल दोन तास अत्यंत तणावपूर्ण वातावरणात दीर्घ चर्चा झाली. घोटाळ्यातील सहभागाचे पुरावे समोर असल्याने अखेर अतुल महाजन यांनी बचावात्मक पवित्रा घेत संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली. ठेवीदारांच्या कष्टाचा पैसा सुरक्षित असून तो टप्प्याटप्प्याने परत केला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले. महाजन यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारल्याने संतप्त ठेवीदारांचे समाधान झाले आणि दुपारनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.(क्रमशः)