वर्धा -/बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या’राष्ट्रीय बंजारा परिषद’या संघटनेच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी शुभम राठोड यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे संघटनेला जिल्ह्यात एक तरुण आणि आक्रमक नेतृत्व मिळाले असून,संपूर्ण जिल्ह्यात समाजबांधवांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास
संघटनेचे मार्गदर्शक आदरणीय किसन राठोड यांच्या आदेशानुसार ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मोहन चव्हाण,राष्ट्रीय सल्लागार विलास राठोड,राष्ट्रीय कार्याध्यक्ष अॅड.पंडित राठोड,आणि विदर्भ अध्यक्ष सुदाम राठोड,यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोरनायक उमेश राठोड यांनी अधिकृत नियुक्ती पत्र देऊन शुभम राठोड यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.
‘समाजाचा आवाज बुलंद करणार’ – शुभम राठोड
आपल्या नियुक्तीनंतर बोलताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शुभम राठोड यांनी संघटनेचे आभार मानले.तर त्या वेळी त्यांनी सांगितले की “राष्ट्रीय बंजारा परिषद ही केवळ संघटना नसून समाजाच्या हक्कासाठी लढणारे एक व्यासपीठ आहे.आदरणीय किसन आणि उमेश यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे,त्याला जागून मी वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तांड्यापर्यंत संघटनेचे विचार पोहोचवेन.व गोर-बंजारा समाजाचे शैक्षणिक,सामाजिक आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.असे सांगून
वर्धा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण
शुभम च्या निवडीची बातमी समजताच वर्धा जिल्ह्यातील बंजारा बहुल भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून समाजबांधवांनी आपला आनंद व्यक्त केला.समाजातील तरुणाईमध्ये या नियुक्तीमुळे मोठा उत्साह दिसून येत असून,”आता जिल्ह्याचा आवाज दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचेल,” अशी भावना व्यक्त होत आहे.
लवकरच शुभम राठोड नेतृत्वत्वाखाली वर्धा जिल्हा कार्यकारणी जाहीर केली जाणार असून,संघटनेच्या माध्यमातून जिल्हाभर जनसंपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे.