🔥राष्ट्रीय सेवा श्रम संस्कार शिबिराचे उदघाटन,तरूणांना कृतिशील व समाजनिष्ठ व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना,किरण ठाकरे.
भिडी-देवळी -/ महाराष्ट्र ही विरपूरूषांची संतांची भूमी आहे या मातीनी भारतमातेचा गौरव वाढविला आहे प्रत्येक भारतीय थोर पूरूषांनी स्वत:ला समाज हितासाठी व राष्ट्रहीतासाठी वाहून घेतले आहे म्हणून भारतीय थोर पूरूषांचा आदर्श घेऊन आजच्या तरूणांनी समाजासाठी राष्ट्रासाठी विधायक कार्य करण्याची दृष्टी ठेवली पाहीजे व त्यासाठी अविरत कष्ट घेतले पाहीजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामिण भागात जाऊन तेथिल शेतकरी ,शेतमजूर यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी काय उपाय ओजना करता येइल यासाठी सदैव झटले पाहिजे कारण राष्ट्रीय सेवा योजना ही तरूणांना कृतिशील व समाजनिष्ठ करणारे व्यासपिठ आहे म्हणून विद्यार्थी दशेत जास्तित जास्त तरूणांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी घ्यावा असे आव्हान देवळी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी केले जय विकास महाविद्यालय शिरपूर (होर ) च्या राष्ट्रीय सेवा
योजना निवासी श्रमसंस्कार शिबीराचे सत्य साईं ग्रामिण सेवा केंन्द्र येथिल उदघाटण कार्यक्रमातून ते बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्राम विकास संस्था चे अध्यक्ष जितेन्द्र महल्ले तर प्रमूख अतिथी एस. एस.एन.जे. महाविद्यालय (राळेगाव )येथिल मराठी विभाग प्रमूख प्रा., डॉ प्रभाकर ढाले ,कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव येथिल इतिहास विभाग प्रा., डॉ विशाल दौलतकर ,ग्रामिण आरोग्य केन्द्र(सेवाग्राम) डॉ श्रिराम ,डॉ मेधावी, जूनियर काॅलेज शिरपूर च्या प्रा.मिनल महल्ले,पत्रकार राजू वाटाणे,प्रा. निलेश गोडे,प्रा. नरेन्द्र डेबे,प्रा. आशिष ढगे,सचिण बिरे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सूरवात राजमाता जिजाऊ ,स्वामी विवेकानंद,गाडगे महाराज, राष्ट्रसंत तूकडोजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली राष्ट्रीय सेवा योजना व विद्यापीठ गित सादर करण्यात आले व ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा., डॉ मनोज ढोणे यांनी केले तर सूत्रसंचालन कू.श्र्वेता चौधरी, व सौ . वर्षा वरफडे, आभार प्रा.दिलीप गुर्जर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वयंसेवक , महाविद्यालयाचे अमित दारूण्डे,प्रतिक्षा नासरे,प्रगती ठाकरे ,स्वाती राजूरकर ,सूजाता भांदककर ,गजानन लोखंडे ,गणेश धरत,लांबे ,आशिष बर्दिया,मिलींद तागडे,सचिण खडसे,निखील दिगडे, निलेश खडसे ,सोनू वरफडे ,सूशिल होरे यांनी परीश्रम घेतले -+-
सत्य साईं सेवा समिती च्या वतिने नवनिर्वाचित देवळी चे नगराध्यक्ष कीरण ठाकरे यांचा साईं सेंटर केन्द्राचे अध्यक्ष सूरेश आलोडे साईं सेंटरच्या वतिने सत्कार करूण त्यांना शाल श्रिफळ व साईबाबांची प्रतिमा भेंट देऊण गौरवण्यात आले.