🔥उमरा आणि पारडी घाटावरून 1 कोटी 57 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त.🔥12 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल तर 5 आरोपींना अटक..
सिंदी (रेल्वे) -/समुद्रपुर तालुक्यातील उमरा व पारडी शिवारातील वणा नदीतील रेती घाटावर शासनाने प्रधिकृत केलेल्या नियम व अटीचे शर्तीचे उल्लघन करुन अवैध रेती तस्करी करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांनी कारवाई करीत 1 कोटी 57 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 12 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून 5 आरोपींना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार शासनाने प्रधिकृत केलेल्या नियम व अटीचे शर्तीचे उल्लघन करुन वणा नदीच्या उमरा शिवारात रेती घाटावर अवैध रेती तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना मिळताच त्यांनी २२ मे रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या पथकासह आयपीएस चव्हाण समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर व पोलिस कर्मचाऱ्यांनी वणा नदीच्या उमरा आणि पारडी रेती घाटावर धाड टाकली असता याठिकाणी आरोपी पोकलेन व जेसीबी साहाय्याने अवैध रेतीचा उपसा करतांना आढळून आले. यावेळी पोलिसांनी 20 लाख रुपये किंमतीचे टिपर क्रमांक एम, एच 32 ए.जे 5588, 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक क्रमांक एम. एच 32 ए.जे 3388, 20 लाख रुपये किंमतीचे टिपर क्रमांक. एम, एच 32. जे 7162, 20 लाख रुपये अशोक टिपर क्रमांक एम एच 32 ए. जे 1007, टाटा ए.एल 613 टूबो कपनिचा 15 लाख रुपये किंमतीचा एम. एच 31 सि बी 6030, विना क्रमाकाचे पोकलाँन्ड मशिन किमत 35, लाख एम.एच 40 बि.इ. 6866 क्रमाकाचा जे.सि.बी किंमत 20 लाख, एक टाटा हॉरीयर एम. एच 32 ए. एस. 7766 किंमत 7 लाख असा एकूण 1 करोड 57 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन यासंबंधी आरोपी भुषण वाघमारे राहणार सेलु, सुरज होले राहणार वर्धा, संदीप रामदास मडावी वय 40 वर्ष राहणार धानोली मेघे, नामदेवराव गोडागे वय 40 वर्ष राहणार सालई पेवट, चंदु साखरे राहणार येळाकेळी, सुरज दाते राहणार वर्धा अरविंद रॉय राहणार हिंगणी, महेश बहीरे राहणार दहेगाव, संजय ससाने राहणार पारडी, निखील गोळकर, सतिश वाघमारे, निखील रोखडे राहणार सिंदी (रेल्वे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यातील सतिश वाघमारे, चंद्रकांत साखरे, सुरज गाते, संदिप मडावी, अरविंद बोडंगे या 5 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये महसूल विभाग सर्तक झाला असून त्यांनी सुद्धा आपली दंडाची कारवाई सुरू केली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, यांच्या प्रत्येक्ष मार्गदर्शनात आयपीएस चव्हाण, ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पथक व समुद्रपुर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली असुन पुढीलतपास ठाणेदार संतोष शेगावकर करीत आरोपींना अटक करण्याची पोलिसांची प्रक्रिया सुरू आहे.