लघु वृत्तपत्र हे जनसामान्यांच्या समस्या प्रशासन दरबारी पोहचवितात
प्रतिनिधी/ वर्धा:
पत्रकारिता चे पितामह बाळशास्त्री जांभेकर चा जयंती दिवस पत्रकार दिवस मनहून साजरा करत असताना पत्रकारिताच्या क्षेत्रात मागील 25 वर्ष पासुन आपली सामाजिक बांधिलकी ठेवत अविरतपणे सेवा देणाऱ्या पत्रकारांचे सत्कार करणे हे उपक्रम पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देणारे आहे कोविड च्या काळात पत्रकार बांधवानी आपली सामाजिक बांधिलकी ठेवत उत्कृष्ट कार्य केले वर्धा जिल्ह्यातील लघु वृत्तपत्र धारकांना मागील 2 वर्ष पासून आर्थिक त्रास सहन करावे लागले आहे तरी पण आपली जवाबदारी प्रमाणिक पणे पार पाडत कर्तव्य त्यांनी बजविले आहे. मोठ्या वृत्तपत्र सोबत लघुवृत पत्र हे सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे असे उदगार आपल्या संबोधन मध्ये प्रेरणा देशभ्रतार जिल्हाधिकारी वर्धा यांनी स्पष्ट केले या वेळी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड पत्रकार संधाचे अध्येक्ष अजीज शेख दिनेश पाटील उपस्थित होते प्रास्ताविक चा दिनेश पाटील यांनी केले तर या प्रसंगी पत्रकार जेष्ठ पत्रकार विजय अजमिरे अश्विन शाह शोहेब कन्नोजी माहिती कार्यालयाचे लिपिक दिलीप बोडसे शांतीलाल गांधी यांचा सत्कार करण्यात आला समारंभ चे उत्कृष्ठ संचालन पत्रकार कर्मीश खडसे यांनी केले आर्वी, आष्टी, पुलगाव, वर्धा येथील पत्रकारांना शाल श्रीफळ, व स्मृतिचिन्ह प्रदान करून जिल्हाधिकारी च्या हस्ते सन्मानित करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम ला मोठ्या संख्येने कोविड नियमाचे पालन करत पत्रकार उपस्थित होते