लहान आर्वी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी: ऐवज लंपास
प्रतिनिधी / आष्टी (शहीद)
लहान आर्वी येथे एकाच रात्री लगातार तीन ठिकाणी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. ही चोरीची घटना १९ डिसेंबरचे मध्यरात्री १ ते २ चे दरम्यान घडली असल्याचे बोलले जात आहे. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाली हे लहान आर्वी च्या इतीहासातील पहीलीच घटना असुन येथील नागरीक घाबरले आहे.सविस्तर व्रुत्त असे की, चोरट्यांनी सर्व प्रथम लहान आर्वी येथील वार्ड क्रमांक १ मधील लोहार चौकातील उमेश साहेबराव मख यांचे स्टेशनरी दुकानाचे शटर फोडुन चोरी केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्यात चोरट्यांनी पाच हजार रूपये रोकड व काही सामान चोरून नेल्याचे कळले. चोरट्यांनी लगेच आपला मार्ग बदलवीत वार्ड नं ३ मधील आझाद चौकातील शिक्षक अतुल रामदास होले यांचे घर फोडुन घरातील लोखंडी दोन कपाट व एक लाकडी कपाट फोडुन त्यामधील १० ग्रॅमची एक पोथ, ३ ग्रॅम कानातले, ५ ग्रॅमची अंगठी,राणी छाप चांदीचे पैसे, असे दाग-दागीने व मोठा ३५०००/-रूपये कींमतीचा नवीनच घेतलेला एलईडी टीव्ही चोरून नेला आहे. यांची अंदाजे किंमत दिड लाख रूपये आहे.अतुल होले हे शिक्षक असल्याने ते यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे राहतात.त्यामुळे त्यांचे घराला लाॅक होते. येथे चोरट्यांनी घरी कुनी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी आपला बर्यापैकी हाथ साफ केला.लगेच चोरट्यांनी तेथेच लागुन असलेल्या नारायण नामदेव घाटोळ यांच्या कीराणा दुकानाचे शटरचे लाॅक तोडुन शटर वर केले. चोरटे दुकानात घुसताच बाजुचे रहीवासी घरमालक सुभाष पुंजाराम होले हे लघुशंकेसाठी उठले असल्याने तेथुन चोरट्यांनी पळ काढला. सदर चोरटे तिघे असुन त्यांचे जवळ शाईन गाडी असल्याचे दुरून दिसून आल्याचे बोलले जात आहे.सदर चोरटे त्यांचे बुचीवरून शिख समाजाचे असावे असा गावकरी अंदाज करीत आहे.चोरीच्या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील देवानंद पाटील यांनी लगेच आष्टी पोलीसांना दीली. सकाळी घटनास्थळी आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक खेडकर यांनी आपले चमुसह तीन्ही घटना स्थळाचा स्थानिक पोलीस पाटील व घरमालक यांचे समक्ष पंचनामा केला. यावेळी दुपार पर्यंत श्वानपथक येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक खेडकर यांनी दिली.