लाडखेडचे ठाणेदार विनायक लंबे यांचे विश्वासू जमादार सावदे,आशिष अवजाडे व सुनिल राठोड अमर, अकबर,अँनथोनी या त्रिमुर्ती दलालांच्या माध्यमातून जुगार चालकाकडून लंबेची हप्ता वसुली….

0

🔥लाडखेडचे ठाणेदार विनायक लंबे यांचे विश्वासू जमादार सावदे,आशिष अवजाडे व सुनिल राठोड अमर, अकबर,अँनथोनी या त्रिमुर्ती दलालांच्या माध्यमातून जुगार चालकाकडून लंबेची हप्ता वसुली.

        🔥हेच ते बोरी,महागाव येथील मटका व जुगाराचा अड्डा.         

🔥लाडखेड पोलिस स्टेशन अंतर्गत महागाव आऊट पोस्टचे जमादार आशिष अवजाडे यांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध धंद्यामुळे अनेकांचे कुटुंब होतेय उद्ध्वस्त.

🔥लाडखेडचे ठाणेदार विनायक लंबे यांच्या आशीर्वादाने लाडखेड सह परिसरातील गाव खेड्यात अवैध वावसायाचा सुरू झाला नंगा नाच.

🔥लाडखेड परिसरातील अवैध धांदेवाल्या कडून लाचेची हप्ता वसुली करीता विनायक लंबे यांनी त्यांचे विश्वासू वसुली दलाल महागाव आऊट पोस्टचे जमादार आशिष अवजाडे बोरी अरब चे जमादार सावदे, शिपाई सुनिल राठोड अमर,अकबर,अँनथोनी या त्रिमुर्ती ची केली नियुक्ती

🔥दैनिक साहसिक वृत्तपत्रात लाचखोर ठाणेदार विनायक लंबे यांच्या भ्रष्ट कारभाराचे वृत्त प्रकाशित होताच लाडखेड येथील अवैध धंदे बंद असल्याचा लंबे यांनी केला देखावा येथील जुगाराचा अड्डा बोरी अरब येथे वळविला.

ठाणेदार लंबे चे लाडके विश्वासू त्रिमुर्ती वसुली दलालांच्या माध्यमातून हप्ता वसुली जोमात – विनायक लंबे चे उखळ पांढरे

🔥लाडखेड ठरतोय अवैध धंद्याचे माहेरघर – पोलिस व प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह- मटका,जुव्वा, जुगाराच्या माध्यमातून विनायक लंबेची लांबलचक लांबलचक कमाई.

🔥लाडखेड पोलीस स्टेशनचे लाचखोर ठाणेदार विनायक लंबे यांच्या भ्रष्ट कारभाराची पोलीस अधीक्षक कुमार चंता दखल घेणार का?

यवतमाळ -/ सध्या जिल्हयात अवैध्य व्यवसाय करणाऱ्याची तुती बोलत आहे.राजकीय वरदहस्तामुळे पोलीस प्रशासन आपले हात बांधून बसले आहे की काय? रेती तस्करी, अवैध्य दारु अड्डे, सट्टा- पट्टी, मटका, जुगार, कोंबड बाजार हे सर्व अवैध धंदे जिल्हयात काही लाचखोर अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू आहे या अवैध धांदेवाल्या सोबत जिल्हयातील काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी हात मिळवणी करुन लाखो रुपयाची अवैध्य लाचेची वसुली करीत आहे.
पोलिस ठाणे हे माया जमविण्याचा साधन नसून ते जनतेच्या सेवेसाठी आहे. याचे भान काही पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना राहिले नाही.
जनतेचा खाकी वर्दी वर एकेकाळी विश्वास होता.गावात पोलीस दादा आला म्हटले तरी लोकांच्या मनात भिती निर्माण होत होती. आताच्या काळात अवैध धंदेवाले पोलीसांना कवडिची किंमत देत नाही. कारण त्यांच्या सोबत पोलीस आर्थिक हित जोपासले यामुळे अवैध धंदे दिवसेन दिवस वाढत आहे. परंतू अवैध्य धंदे कमी होण्याचे नाव घेत नाही.
सध्या असाच प्रकार लाडखेड ठाणेदार विनायक लंबे यांचा चालला आहे.
लाडखेड येथील ठाणेदार विनायक लंबे व त्यांचे विश्वासू वसुली दलाल जमादार आशिष अवजाडे, जमादार सावदे,व शिपाई सुनिल राठोड अमर, अकबर,अँथोनी या त्रिमुर्तीनी लालसेपोटी केवळ खिसे गरम करण्याच्या नादात मटका जुगार चालकांना अलिखीत परवानगी देऊन लाखो रुपयाची हप्ता वसुली करून गल्लेलठ्ठ माया जमविल्याची चर्चा लाडखेड परिसरात रंगल्या जात आहे.
विनायक लंबे यांची पोलीस दलात भरती झाली तेव्हां कायद्याचे रक्षण व पूर्ण इमानदारीने काम करण्याची त्यांनी घेतलेली शपथ ते विसरून अवैध कमाईच्या लालसेपोटी कायद्याचे रक्षण करण्या ऐवजी कायदा व सुव्यवस्था बाधित करून युवा पिढीला जुगाराच्या विळख्यात ढकलण्याचे काम करत आहेत.
लंबे यांच्या आशीर्वादाने लाडखेड,बोरी अरब,महागाव सह आजुबाजुच्या गाव खेड्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध्य धंदे सुरु आहे.जागोजागी मटका, जुव्वा, जुगाराचे अड्डे थाटण्यात आले आहे.
लाडखेड येथे मध्यभागी नांदेड, अकोला,शेगाव,बुलढाणा मार्गावरील चौफुली जवळ मोठे शेड निर्माण करून सर्व सोय सुविधा उपलब्ध करून येथील ठाणेदार विनायक लंबे यांच्या छाया छत्राखाली जमादार सावदे शिपाई सुनिल राठोड यांनी जुगाराच्या अस्तित्व निर्माण केले.
लाडखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरी अरब येथे पल्लवी हॉटेल मागे ग्रामपंचायत समोर, आठोडी बाजार,बस्थानक समोरील दुकान गाळ्यामगे, असे तीन ते चार काउंटर तसेच महागाव येथील उर्दू शाळेजवळ व येथील देऊरवाडी रस्त्यावर पुलाच्या बाजूने देशमुख यांच्या शेतात मोठे शेड निर्माण करून या जुगाराचे अड्याला विनायक लंबे यांनी हप्ता घेवून प्रवांगी दीले आहे.
दैनिक साहसिक वृत्तपत्राच्या दणक्याने ठाणेदार विनायक लंबे यांनी महागाव येथील जुगाराचा अड्डा देऊरवाडी मागील देशमुख यांच्या शेतात नेऊन थाटले.
बोरी अरब सह गाव परिसरात सध्या अवैध धंद्यांना अक्षरशः डोके वर काढले आहे. विशेषतः बोरी अरब, महागाव ओपी. वडगाव गळवे, लाडखेड सह परिसरात मटका जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू असून हे सर्व कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत, असा संतप्त सवाल
नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बोरी अरब येथे ठाणेदार विनायक लंबे यांच्या आदेशाने बोरी अरब चे बीट जमादार सावदे,महागाव आऊट पोस्टचे जमादार आशिष अवजाडे, शिपाई सुनील राठोड शिपाई शेंडे याच्या आशीर्वादाने परिसरात राजरोसपने मटका सेंटर सुरू असल्याचे चित्र आहे. दिवसा-रात्री या अड्डयावर गर्दी दिसून येते. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना संबंधित वरिष्ठांची चुप्पी नागरिकांना खटकत आहे.
या अवैध मटका जुगार व्यवसायामुळे परिसरातील बेरोजगार युवक, मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात या जुगाराच्या विळख्यात अडकत आहे.
सोप्या कमाईच्या लालसेपोटी अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर पडत असून आर्थिक सामाजिक आणि मानसिक नुकसान होत आहे.
अनेक घरांमध्ये कर्जबाजारीपणा घरगुती वाद,व्यसनाधीनता वाढताना दिसत आहे.

🔥तरुणाई उद्ध्वस्त, गुन्हेगारीला खतपाणी.

हा केवळ जुगार नाही, तर ही सामाजिक व्यवस्था पोखरून काढणारी वळवी आहे.
या हायप्रोफाईल अड्यामुळे युवा पिढी बरबाद होवून सोप्या पैशाच्या कमाईतून तालुक्यातील तरुण पिढी या दलदलीत ओढली जात आहे. जुगाराच्या नादात अनेक सामान्य कुटुंबे रस्त्यावर आली असून घराघरात वाद पेटले आहेत.
गुन्हेगारीत वाढ

जिथे जुगार अला, तिथे अवैध दारू आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तींना आपोआपच खतपाणी मिळत आहे.
राजकारण्यांचे वरदहस्त लाभले की कायद्याचे रक्षक कसे हतबल होतात आणि गुन्हेगारांचे मनोबल कसे उंचावते,याचे जिवंत उदाहरण सध्या लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी अरब,महागाव,सह येथील गाव खेड्यात पाहायला मिळत आहे.
लाडखेड येथून बोरी अरब येथे वळविण्यात आलेला जुगार अड्डा येथील रहेवासियांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
लाडखेड,बोरी अरब महागाव, येथील अवैध कट पत्त्याचा ‘बादशहा’ नाना केडदकर,फारुख कुरेशी, तोकिर,विलास, तिवारी मामाचा भाचा या जुगार चालकांनी लाडखेड,बोरी अरब,महागाव
परिसरात लाखोंचा उलाढालीचा जुगार अड्डे सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण स्थानिक प्रकरणावर लोकप्रतिनिधींचे ‘मौन’ आणि प्रशासनाची ‘डोळेझाक’ ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब
ठरत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, इतक्या खुलेआम सुरू असलेले मटका अड्डे वरिष्ठांच्या निदर्शनास कसे येत नाहीत. हा मोठा प्रश्न आहे. कारवाई न होण्यामागे कुणाचे राजकीय अथवा आर्थिक पाठबळ आहे का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत लाडखेड, बोरी अरब, सह महागाव परिसरातील सुजाण नागरिकांची तात्काळ कठोर कारवाईची मागणी आहे.
नविन पिढीला व्यसनधित करण्याचे काम सध्या लाडखेड पोलीस ठाणेदार विनायक लंबे यांचे मार्गदर्शनात यांचे लाडके जमादार सावदे,आशिष अवजाडे शिपाई सुनिल राठोड शिपाई शेंडे या चार वसुली दलालांच्या देखरेखीत सर्व प्रकारच्या अवैध धंद्याला परवानगी देऊन लाखोंची हप्ता वसुली सुरू आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत लाडखेड, बोरी अरब,महागाव सह परिसरातील सुजाण नागरिकांची तात्काळ कठोर कारवाईची मागणी आहे.अवैध मटका,जुगार अड्डे बंद करून संबंधित चालकांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या लाडखेडचे लाचखोर ठाणेदार विनायक लंबे व त्यांचे सहकारी वसुली दलाल बोरी अरब चे बीट जमादार सावदे, महागाव ओपीचे आशिष अवजाडे, शिपाई सुनिल राठोड, शिपाई शेंडे यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!