साहुर,आष्टी -/तालुक्यातील साहुर सर्कल मधिल साहुर,बोरगाव,वडाळा,वर्धपुर, सत्तरपुर,जामगाव,सावंगा पुनर्वसन इत्यादी अनेक गावातुन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोनशे रुपये प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांकडुन ऐका सातबाराचे दोनशे रुपये प्रमाणे ऑनलाईन च्या नावाखाली जमा केले परंतु शेतकऱ्यांना सौरऊर्जा झटका मशिन व तार देण्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दोनशे रुपये प्रमाणे लुट करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर संशय आला आणि शेतकऱ्यांचा मोर्चा सुमित दादा वानखडे प्रचार प्रमुख वर्धा लोकसभा क्षेत्र यांच्या सहीत वनपरिक्षेत्र अधिकारी आष्टी यांच्या कार्यालयात धडकला परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित नसल्याने भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला त्यामुळे वनविभाग कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून शेतकरी तक्रार दाखल करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करून ज्या वनविभाग कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक लुट केली त्यांना निलंबित करण्याची मागणी शेतकरी करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दीली आधिच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यामध्ये वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची लुट करण्याचे सापडे रचल्याने शेतकरी मातीमोल झाला आहे जंगली जनावरे शेतातील उभे पीक खातात तर वनविभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना खात आहे या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन सुमित दादा वानखडे प्रचार प्रमुख वर्धा लोकसभा क्षेत्र यांनी शेतकऱ्यांना दिले आता यावर काय कारवाई होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत हे विशेष.