वर्धा जिल्हा गौरव पुरस्कार सोहळा 21 आगस्ट रोजी आयोजित….

0

वर्धा -/ जिल्ह्यातील सुपरीचित व सुप्रसिद्ध स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा या संघटनेच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता स्थळ सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय सभागृहात वर्धा जिल्ह्यातील अनेकविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्व गाजविणाऱ्या 21 मान्यवरांचा गुणगौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर भाऊ काळे तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीनजी रहमान तर विशेष अतिथी म्हणून पुण्याचे अतिरिक्त आयकर आयुक्त राजेश गवळी, देवळीचे ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक मोहनबाबू अग्रवाल, आनंदवन वरोरा चे विश्वस्त सुधाकरजी कडू, कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्राम चे अध्यक्ष परमानंदजी तापडिया, रंगभूमी प्रयोग परी निरीक्षक मंडळ मुंबईचे सदस्य डॉ. रमेश थोरात, नवशितीज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष सुनील कुमरे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, निम्न वर्धा प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता अमोल आठवले, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पवन तिजारे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मोहन मोहीते, स्पोर्ट कराटे असोसिएशनचे संरक्षक इमरान राही, अध्यक्ष सतीश ईखार प्रामुख्याने मंचावर उपस्थित राहणार आहे.या सत्कार सोहळ्यात डॉ. इंद्रजीत खांडेकर, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. राजेंद्र गंजीवाले, संतोष शेगावकर, डॉ. किरण नागतोडे, अविनाश काकडे, गजानन कुबडे, निरंजन वरभे, मुस्तफा बख्श, चेतनबाबू अग्रवाल, सुप्रिया घडे, डॉ. अभय मोहिते, दिलीप रोकडे, डॉ. विद्या कळसाईत, संध्या सायंकार, रवि काकडे, ज्ञानेश्वर हिवसे, प्रतीक सूर्यवंशी, अश्विनी काकडे, सरला चापडे, पुष्पा तपासे हे सत्कारमूर्ती सन्मानित होणार आहे.कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव तथा आयोजक मंगेश भोंगाडे, पुरस्कार निवड समिती सदस्य गंगाधर पाटील, भगवानदास आहुजा, श्याम पठवा, विलास कुलकर्णी, प्रवीण पेठे, हरीश पाटील, तसेच संस्थेचे संचालक प्रकाश खंडार, कार्याध्यक्ष संतोष सेलुकर, कोषाध्यक्ष विजय सत्याम, सदस्य निखिल सातपुते, सुनील चंदनखेडे, खेमराज ढोबळे, सचिन झाडे, उमेश चौधरी, हेमलता काळबांडे, संदीप वरघट आदींनी केले आहे.

गजेंद्र डोंगरे साहसिक news -24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!