🔥वर्धा नदीवरील पुलावर अज्ञात व्यक्तीचा अपघात…अपघाताचे कारण पोलिसांनाही कळू शकले नाही
आष्टी शहीद -/नजीकच्या दृगवाडा येथील वर्धा नदीच्या पुलावर एका अज्ञात व्यक्तीचा अपघात झाला असून हा अपघात दिनांक 8 मार्च रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान झाला असून या अपघाताबद्दल परिसरात कोणालाच माहिती नसल्याचे सांगण्यात येते
पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मृताच्या खिशात मिळालेल्या आधार कार्ड नुसार अशोक केशवराव डाफ वय 80 वर्ष रा. गनोरी रोड गणेश नगर यवतमाळ येथील मृतक व्यक्ती रहिवासी असून हा व्यक्ती स्वतःची लुना गाडी एम एच 29 बी आर 8123 क्रमांकाच्या गाडीने कुठून कुठे जात होता कुठे राहत होता ही माहिती पोलिसांनाही मिळाली नाही पोलिसांच्या सांगण्यानुसार सदर व्यक्तीच्या गाडीमध्ये दारूच्या दोन निप होत्या त्यामुळे हा अपघातग्रस्त व्यक्ती सुद्धा दारू पिऊन असावा व त्याचा स्वतःच अपघात झाला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे सदर अपघात स्थळ बेनोडा पोलिसांच्या हद्दीत येत असून दृगवाडा व हातुर्णा येथील नागरिकांच्या सूचनेवरून बेनोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला प्रेत उच्चस्तरीय तपासणी साठी सामान्य रुग्णालय वरुड येथे पाठवण्यात आले घटनास्थळी बेनोडा पोलीस स्टेशनचे ललित तायडे निकिता उमाळे उपस्थित होते पुढील तपास बेनोडा पोलिसांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.