वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेतीचोरी व अवैध वाहतुकीवर धडक कार्यवाही… 

0

🔥माजी उपनगराध्यक्षासह १० आरोपींवर गुन्हे दाखल.

हिंगणघाट -/ वणा नदीचे पात्रातील रेती चोरी करीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एकूण सात ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकुण ५०,८१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कारवाई पोलीसांच्या वर्धा येथील स्थानीक गुन्हे शाखेने केली काल बुधवार रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथक हिंगणघाट पोलिस विभागाअन्तर्गत येणाऱ्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या माहितीनुसार, वणा नदी पात्राचे कवडघाट व पारडी (नगाजी)येथील रेतीघाटातुन ट्रॅक्टरमध्ये रेती चोरी करून हिंगणघाट शहराकडे निघाले होते.
पेट्रोलिंग दरम्यान दोन वेगवेगळे पथक तयार करून वणानदी पात्राचे कवडघाट तसेच पारडी रेतीघाट परिसरातून हिंगणघाट कडे येणाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी केली. नाकेबंदी दरम्यान वणा नदी कवडघाट कडून हिंगणघाट कडे येतांना अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर तसेच पारडी(नगाजी)येथील रेती घाटातून हिंगणघाटकडे येताना ३ ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीची ओली काळी रेती भरून वाहतूक करीत रंगेहाथ पकडले.
यावेळी आरोपी नामे ट्रॅक्टर चालक – राजेश सूर्यभान पढाल(४८) रा.गाडगेबाबा वार्ड, ट्रॅक्टर मालक राजेंद्र मधुकर उपाध्ये रा. तेलीपुरा चौक (पसार), चालक – नरेश आनंदराव रामटेके (४८) रा. मजुमदार वार्ड, ट्रॅक्टर मालक ,दीपक पांडुरंग सुरकार, रा. निशानपुरा वार्ड,(पसार),ट्रॅक्टर चालक संजय शंकरराव कुडसंगे(४५) रा. कांनापूर, हिंगणघाट, ट्रॅक्टर मालक – स्वप्निल देविदास सुरकार, रा. निशानपुरा वार्ड (पसार), ट्रॅक्टर चालक – गजानन हरिदास मोरे(४५)रा. गाडगेबाबा वार्ड ट्रॅक्टर मालक – जीतेंद्र ब्रिजमोहन चव्हाण, रा. टिळकवार्ड (पसार),ट्रॅक्टर चालक – संजय गजानन पाहुणे(२७) रा. संत कबीर वॉर्ड , चंद्रकांत शंकरराव मुंढोळकर(२४) रा. पिंपळगाव (ता. हिंगणघाट) मनोज तुकाराम मेश्राम(३२) रा. पिंपळगाव ता. हिंगणघाट ट्रॅक्टर मालक – निलेश ठोंबरे (पसार) रा. हिंगणघाट,ट्रॅक्टर मालक – सौरभ पांडे (पसार) रा. हिंगणघाट हे आरोपी त्यांचे ताब्यातील सातही ट्रॅक्टरद्वारे शासनाचा कोणताही पास परवाना ( रॉयल्टी ) नसतांना अवैधरित्या विना पास परवाना रेतीची अवैध वाहतूक करीत असतांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्यांच्या ताब्यातून २ वेगवेगळ्या कार्यवाहीतून ७ ट्रॅक्टर, ट्रॉली व ७ ब्रास (७००फुट) रेतीसह एकुण ५० लाख,८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर नमुद आरोपींचे विरुद्ध हिंगणघाट पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरिक्षक उमाकांत राठोड,पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, महादेव सानप, रामकिसन ईप्पर, अमोल नगराळे, विकास मुंढे, अरविंद इंगोले, सुगम चौधरी, रितेश गेटमे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!