वर्धा सर्वाधिक हॉट…! विदर्भात वर्ध्यात सर्वात जास्त तापमान
Pramod panbude@wardha :
गेल्या काही दिवसांपासून सूर्यनारायण रोज आग ओकतो आहे. दरम्यान आज 25 रोजी विदर्भात वर्धा जिल्हा सर्वात उष्ण म्हणून नोंदविला गेला. वर्धेचे आजचे तापमान 45 अंश सेलसियस नोंदविण्यात आले. सकाळी 10 वाजतापासून उन्हाच्या झावा जाणवू लगल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत गरम वारे सुरूच होते. गेल्या वर्षी मे महिन्यात वर्धा जिल्ह्याचा पारा 45 गेला होता. यावर्षी तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच 45 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात प्रथमच पारा 45 अंशापर्यंत पोहोचला आहे. कडाक्याचे उन्ह असल्याने बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता. आज नागपूर 43. 06, चंद्रपूर 44.06, ब्रम्हपूरी 44.09 तर अकोला 44 अंश तापमानाची नोंद घेण्यात आली.