वार्षिक पुण्यतिथी महोत्सव,सद्गुरू परमहंस श्री कृष्णगीरी महाराज विश्वशांती धाम संस्थान, धोत्रा (रेल्वे)येथे…

0

🔥वार्षिक पुण्यतिथी महोत्सव,सद्गुरू परमहंस श्री कृष्णगीरी महाराज विश्वशांती धाम संस्थान, धोत्रा (रेल्वे)येथे.

वर्धा -/ दरवर्षि प्रमाणे या ही वर्षी सद्‌गुरू परमहंस श्री कृष्णगीरी महाराज पुण्यतिथी महोत्सव-2026 आणि स्व. शंकरबाबा गुल्हाने व स्व. विमलआई शंकरराव गुल्हाने यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ “शिव महापुराण कथे” चे आयोजन केले आहे. कथेचे प्रवक्ते पूज्य श्री श्यामनारायणदासजी महाराज (श्री अयोध्या, संस्थापक श्री मधुरम सेवा प्रतिष्ठान अमरावती) यांच्या पावन मुखातुन बुधवार दिनांक 14/01/2026 पासुन आरंभ झाली आहे.
श्री शिव महापुराण तंत्र विज्ञानाचे सर्वोत्तम मार्गदर्शन…!
पूज्य श्री शामनारायणदास महारज आपल्या वाणीतून शिव महापुराणाचे महत्व सांगत होते. सद्‌गुरु श्री कृष्णगीरी महाराजांच्या पावन महोत्सवाच्या निमित्ताने श्री कृष्णगीरी धाम विश्वशांती संस्थान घोत्रा रेल्वे या ठिकाणी श्री शिव महापुराण कथा आयोजीत करण्यात आली आहे. शिव शब्द म्हणजे कल्याण आहे आनंद सर्व सुख सर्वव्यापक सर्व हितकारक असे अनेक अर्थ शिव या शब्दाचे येऊ शकतात. कृष्णगीरी महाराजांचे हे संस्थान आणि स्व. आई-बाबाच्या समाधी स्थानाला पाहून हे मातृ-पितृ तीर्थ या नावानेच प्रसिध्द व्हावे अशी मनोमन इच्छा श्री महाराजांनी व्यक्त केली.
शिव म्हणजे श्री गुरु स्वरूपत्र त्रैलोख्याचे गुरुतत्व मान्य असून त्याच गुरुतत्वाची सेवा आई बाबानी आयुष्यभर केले त्याचा परिणाम ते शिवस्वरूप संत स्वरूप कृष्णगीरी स्वरूप होऊन त्यांनी आपल्या जिवनाच्या उध्दाराचा मार्ग निश्चित केला. सर्वसाधारण मनुष्याच्या जिवनाचे कल्याणाचे आहे पण नेमके आणि ज्यांच्या करण्याने मनुष्याच्या जिवनाचा एक क्षणही वाया जाणार नाही याकरता जे मार्गदर्शन अनेक ग्रंथांमध्ये केलंय त्या ग्रंथामध्ये शिव महापुराण हे अग्रगण्या आहे.
विश्वामध्ये जो ग्रंथ एकमेव असा आहे की ज्याच्याव्दारे तंत्र मंत्र यंत्र या सर्वांचं एक महत्वपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होत असते. मानवी जिवनाच्या विवेक बुध्दीचा सर्वोत्तम भाव ज्या एका ग्रंथश्रमणांनी प्राप्त होतो तो हा ग्रंथ शिव महापुराण बिंदू आहे. चंचला यांच्या उदाहरणाच्या व्दारे पापात्मक वृत्तीतून निवृत्त होऊन मनुष्य पिशाच्च योनीमध्ये जरी असला तरी मात्र तो शिव महापुराण ग्रंथाच्या श्रवणमात्रांनी तात्काळ कल्याण मार्गाला लागू शकतो. भगवान शिव गृहस्थाश जिवनाचे आदर्श आणि स्वभावामध्ये जरी भेद असेल तरी एक कुटुंब एकसंघ पध्दतीने राहू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्री शिव महा पार्वती भगवान गणेश श्री कार्तिकीय
नंदी राज एवम पंचायतन स्वरूपाचं हे दर्शन केल्याने आपणास त्याची प्रचिती येते. संसारिक व व्यक्तीगत जिवन जगताना आपण आपल्या अंतर्मनामध्ये ज्या महत्वपूर्ण तत्व साधनाचे चिंतन करणे गरजेचे आहे ते साधन म्हणजे शिव महापुराण आहे. असे महाराज आपल्या वाणीतुन श्रोत्याना सांगत होते.
यावेळे झाकी स्वरूप भगवान शिव, विष्णु आणि ब्रम्हा यांचे दर्शन श्रोत्यांना झाले. तसेच रविवार दिनांक 18/1/2026 रोजी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीर, मातृ वंधत्व शिबीर आणि दंत तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. तरी याशिबीराचा लाभ जास्तीत जास्त लोकांणी घ्यावा असे कार्यकमाचे आयोजक कृष्णगीरी परीवाराच्या वतीने सांगण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!