विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना अध्यक्षपदी रवी पवार तर उपाध्यक्षपदी सलमान शरीफ खान

0

🔥विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना,अध्यक्षपदी रवी पवार तर उपाध्यक्षपदी सलमान शरीफ खान.

यवतमाळ -/ जिल्हा परिषद शाळा तळणी तालुका आर्णी येथे नव्या शाळा व्यवस्थापन समितीची उत्साहात स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी रवी नामदेव पवार यांची तर उपाध्यक्षपदी सलमान शरीफ खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

समितीमध्ये सदस्य म्हणून अर्चना गजानन लोणकर, मंगला राहुल कांबळे, किशोर उत्तम बोकसे, रुकसार अबीद शेख, प्रवीण दत्ता दूधकर, संदीप श्रीराम राठोड, वैशाली मनोज राठोड, प्रवीण गोष्या आडे व संगीता संजय कुंभरे यांची निवड झाली आहे. या निवडीच्या वेळी मुख्याध्यापक फुलके सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच गावातील मान्यवरांमध्ये माजी उपसरपंच शाहिद रयाणी,अशोक वाघमारे, विष्णुपंत लोणकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष, प्रवीण चव्हाण, ज्वालासिंग राठोड (माजी शाळा समिती अध्यक्ष), नूर मोहम्मद मुजफ्फर भाई, शांतारामजी राठोड, ग्रामपंचायत सदस्य शेख नूर, सयद अकबर सयद करीम, शोहेल खान, विजय धुलसिंग राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समितीने एकत्रितपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नवनियुक्त समितीनेही विद्यार्थ्यांच्या कल्याण, प्रगती व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांचा विकास, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वृद्धी आणि पालक-शाळा समन्वय वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

        ब्युरो रिपोर्ट साहसिक         News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!