वर्धा -/जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या अध्यक्ष पदी आज मंगळवारी दैनिक हितवादचे नरेंद्र देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी विदर्भ विभागाचे विभागीय अध्यक्ष किशोर कारंजेकर प्रामुख्याने उपस्थित होते.वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियातील जिल्हाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी आज मंगळवारी स्थानिक विश्रामगृहात बैठक पार पडली. याप्रसंगी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक साहसिकच्या संपादक तथा सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक रेणूकाताई कोटंबकार, विभागीय अध्यक्ष किशोर कारंजेकर, जिल्हा सचिव एकनाथ चौधरी, उपाध्यक्ष निलेश पिंजरकर, प्रफुल्ल लुंगे, प्रवक्ता संजय धोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पदा संदर्भात विस्तृत अशी साधकबाधक चर्चा करण्यात आली. यावेळी सेलू तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी नरेंद्र देशमुख यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला, त्याला सचिव एकनाथ चौधरी यांनी अनुमोदन दिले. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख आणि विभागीय अध्यक्ष किशोर कारंजेकर अशा दोन्ही पदाधिकाऱ्यांचे यावेळी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.दरम्यान प्रफुल्ल लुंगे, संजय धोंगडे, एकनाथ चौधरी यांनी आपले मनोगत तर अध्यक्षीय भाषण रेणुकाताई कोटंबकार यांनी केले.या कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष निलेश पिंजरकर यांनी तर आभार एकनाथ चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कार्याध्यक्ष मिलींद आंडे, कोषाध्यक्ष सचिन पोफळी, प्रा खलील खतीब, प्रशांत कलोडे, संजय बोंडे, पंढरी काकडे, अरविंद गजभिये, सिंदी महानगर अध्यक्ष आनंद छाजेड, देवळी तालुका अध्यक्ष गणेश शेंडे, सचिव किरण राऊत, हिंगणघाट तालुका अध्यक्ष रवी येणोरकर, आर्वी तालुका अध्यक्ष राजू डोंगरे, शैक्षणिक सेलच्या रंजना जळगांवकर, मंगेश काळे, रुपराव मोरे, हर्षल काळे, पंकज तिवारी, चंद्रकांत पवार, प्रफुल्ल भटकर सह व्हॉईस ऑफ मीडियाचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.