शिवणी पाझर तलाव अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी भुमी अभिलेख ईटीएस मोजणी करणार – छावा….

0

 औरंगाबाद,बीड़कीन -/ परिसरातील शिवणी पाझर तलावातून अवैधरित्या मुरूम उपसा करून पाझर तलाव व पर्यावरणाची हानी होत असुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडवल्या प्रकरणी संबंधित माफियांवर तात्काळ फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन दंड वसुल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख किरण काळे पाटील यांनी दि.३१ मे शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली होती.यबाबत जिल्हा खनिकर्म विभागाने निवेदनाची गंभीर दखल घेत अवैध उत्खनन प्रकरणी ईटीएस मोजणी करून विनाविलंब अहवाल सादर करण्याचे आदेश पत्राद्वारे पैठण तहसीलदार यांना दिले आहे.पैठण तहसीलदार यांनी याबाबत उप अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय पैठण यांना पत्र पाठवून अवैध उत्खनन प्रकरणी ईटीएस मोजणी करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा अशी मागणी केली आहे.पैठण तालुक्यातील बिडकीन व शिवणी येथील लघु पाझर तलावासाठी संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रातुन मागील काही दिवसांपासून अवैधरित्या मुरुम उपसा सुरू आहे.सदरील मुरूम उपसा करण्यासाठी तलावामध्ये पोकलेन व जेसीबी या यंत्राच्या सहाय्याने रात्रंदिवस गौण खनिजाचा उपसा केला जात असल्याने तलावात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.परवाण्याच्या नावाखाली फॉर्च्यून इन्फ्राटेक व्हेंन्ट्युरेस एल.एल.पी.मोंढा नाका,छत्रपती संभाजीनगर यांनी शासनाकडून महा खनिज यांचेकडे ५०० ब्रासची रॉयल्टी भरून सदरील उपसा सुरु असल्याचे सांगीतले.सदरील कंपनीने मर्यादेपेक्षा जास्त मुरुम उपसा केला आहे.कंपनीने मौजे बिडकीन येथील गट क्र.२३६ व २४० तसेच मौजे शिवणी येथील गट क्र.३६ मधून प्रत्येकी ५०० ब्रास मुरूम काढण्यासाठी जवळपास १६ रॉयल्टी काढलेल्या आहेत.परंतु प्रत्यक्षात आज पर्यंत जवळपास २० ते २५ हजार ब्रास मुरूम उपसा करण्यात आला आहे.तसेच शासनाचा लाखो रुपयाचा महसुल चुकविल्या प्रकरणी सदरील फॉर्च्यून इन्फ्राटेक व्हेंन्ट्युरेस एल.एल.पी.मोंढा नाका,छत्रपती संभाजीनगर या कंपनी व वाहतूक करणारे वाहन यांचे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी व दंड वसुल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख किरण काळे पाटील यांनी केली असुन कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही जिल्हाप्रमुख काळे पाटील यांनी दिला आहे.

अरक्षद शेख साहसिक news -/24 औरंगाबाद बिडकीन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!