🔥तडस यांच्या नियुक्तीने शिवसैनिकांमध्ये संचारला उत्साह.
सिंदी (रेल्वे) -/ येथील कट्टर शिवसैनिक मानले जाणारे प्रभाकर शामराव तडस यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंगणघाट विधानसभा संपर्क प्रमुख उत्तम आयवाडे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिरापूरकर, उपजिल्हा प्रमुख सुनील पारसे,सेलू तालुका प्रमुख अमर गुंधी तसेच सेलू तालुका समन्वयक योगेश ईखार यांनी शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी शिवसेना कार्यालय सेलू येथे पत्रकाद्वारे नियुक्ती केली आहे.
आई भवानीच्या कृपेने व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्क प्रमुख वर्धा निलेश धुमाळ व हिंगणघाट विधानसभा संपर्क प्रमुख उत्तम आयवाडे यांच्या सुचनेनुसार तसेच जिल्हा प्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनांत दिनाक 22/8/2024 रोज शुक्रवार रोजी शिवसेना उ. बा. ठा. शहर प्रमुख सिंदी या पदावर प्रभाकर तडस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार व पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार वर्धा विधानसभा क्षेत्र भगवेमय करावे व पक्षाने आपल्यावर जो विश्वास टाकला आहे. तो सार्थ ठरवावा पक्षाच्या बळकटीकरणासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रिद वाक्यानुसार गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक जोडण्यात यावा. तसेच पक्षामार्फत सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे. स्थानिक स्तरावरील निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करावे. व त्या निवडणुका लढयाच्या, निश्चितच कराल असा विश्वास ठेवत सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तडस यांना शुभेच्छा दिल्या.
प्रभाकर तडस यांची सिंदी शहर प्रमुखपदी नियुक्ती झाल्याची बातमी शहरात पसरताच शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून तडस यांच्या नियुक्तीबद्धल किशोर खडतकर, मुन्ना शुक्ला, दीपक कोरती, विनोद कातोरे, सतीश कातोरे, राहुल हटवार, संदीप दिवटे, नितीन वाढद्रे, अविनाश लोंडेकर, चंदन तलवारे, विजय हाडके, मुकुल चव्हाण सह आदी शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.