🔥देवळी पोलिसांनी आरोपींना केली अटक. 🔥शुल्लक कारणावरून हत्यातील महेंद्र मोहन मडावी वय ३५ वर्ष रा.अंदोरी
देवळी -/ पासून 12 कि.मी. अंतरावर असलेल्या अंदोरी या गावांमध्ये शुल्लक कारणावरून एकाची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार अंदोरी या गावांमध्ये मृतक महेंद्र मोहन मडावी वय ३५ वर्ष रा.अंदोरी हा कुणाल नारायण नान्हे रा. अंदोरी आपल्या मित्रासोबत गावातील एका खानावळ मध्ये जेवण करण्याकरिता गेला होता. तेथेच आरोपी सौरभ शंकर नान्हे राहणार आंजी(अंदोरी) आपल्या अल्पवयीन मित्रासोबत जेवण करिता आला होता.आरोपी व मृतक यांच्यामध्ये ओळख असल्यामुळे ते आपसात बोलत होते बोलण्या बोलण्यातच त्यांच्यात वाद झाला.नंतर आरोपी सौरभ शंकर नान्हे ने झालेल्या वादामध्ये आपल्या अल्पवयीन मित्रासोबत मृतक महेंद्र मोहन मडावी याच्यावर चाकूने हल्ला केला.मृतका सोबत असलेल्या त्याच्या मित्राने भांडण सोडवण्यासाठी मधात गेल्याने आरोपीने त्याच्यावरही चाकूने वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले . तीन दिवसांपूर्वी देवळी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल झालेली होती.तीन दिवसांपूर्वी जखमींना शासकीय रुग्णालयात वर्धा भरती करण्यात आले होते परंतु तीन दिवसानंतर चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महेंद्र मोहन मडावी राहणार अंदोरी याचा मृत्यू झाला आणि त्याचा मित्र सध्या दवाखान्यामध्ये भरती आहे त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्यास सांगण्यात येते देवळी पोलिसांनी आरोपींना अटक करून विविध कलमे अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा यांनी देवळी पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली पुढील तपास देवळीचे ठाणेदार महेश चव्हाण यांच्या नेतृत्वात देवळी पोलीस करीत आहे.