🔥हेच ते शेती,शेतकरी शेत जमीनी पडीत पडण्याच्या चिंतेत.🔥ह्याच त्या विषारी धुराच्या थरामुळे पिकांची उगम शक्ती होणार कमी.🔥हाच तो धूळ ज्या मुळे शेतकरी आंदोलनाच्या तयारीत.
देवळी -/देवळी येथील रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कोळसा डम्पिंग यार्ड मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकावर व शेतीवर विपरीत परिणाम होत असून कोळशाच्या धुराच्या थरामुळे शेतजमिनी नापिकी क्षेत्र ठरणार आहे असे मत परिसरातील शेतकऱ्यांनी चर्चेतून सांगितले. देवळी रेल्वे स्थानक परिसराला शेतजमिनी लागून आहे. रेल्वे कोळसा डम्पिंग यार्ड मधून निघणारा विषारी धूर दिघी .बोपापुर , नारायणपूर शिवार, अजंती शिवार तसेच सेलसुरा शिवारापर्यंत शेत पिकावरून शेत जमिनीवर पडत असल्याने पुढील वर्षी शेतकऱ्यांच्या शेती पिक बियाणे उगवणीवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात शेतजमिनी पडीत पडण्याची शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून आंदोलन करण्याच्या तयारी आहे.
रेल्वे व्यागेन मधून कोळसा खाली करताना व टिप्पर मध्ये भरताना मोठ्या प्रमाणात धूर निघतो ते हवेत मिसळून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत पिकावर व जमिनीवर धुराचा थर तयार होऊन शेती निकृष्ट होते व त्यामुळे शेतातील पीक उगम शक्ती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो व पिके होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची शेती पिके वाचवण्यासाठी डम्पिंग यार्ड मधून निघणाऱ्या धुराचा बंदोबस्त करणे अतिशय गरजेचे आहे. या धुरामुळे शहरातील संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या टप्प्या मध्ये आला आहे. याआधी औद्योगिक वसाहती मधील प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये आहे यात रेल्वे कोळसा डंपिंग याडच्या धुराचा समावेश झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण देवळी शहर व परिसरातील ग्रामीण भाग या प्रदूषणाच्या विळख्यात आलेला आहे. सेलसुरा, चिकणी, जामनी ,पडेगाव, सोनेगाव ,निमगाव , दिघी ,बोपापुर, या गावांचा परिसर शेती पिके व गावातील आरोग्य प्रदूषणामुळे दूषित झालेली आहे. या औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषणाबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रदूषण महामंडळ लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. या मुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडला आहे .
*नियमबाह्य कोळसा वाहतुकीमुळे रस्त्याची झाली चाळणी*
देवळी वरून दिघी, बोपापुर ,चिखली, सरूड, या गावांना जाण्याकरिता रेल्वे स्थानका जवळूनच जाण्या येण्याचा मार्ग आहे. या डम्पिंग यार्डातील कोळसा मोठ मोठ्या टिप्पर मध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये पावर प्लांटवर नेण्यात येते . अतिभार वाहतूक वरून न झाकता रस्त्यावरून नेण्यात येतो. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहन चालकाच्या डोळ्यांमध्ये कोळशाचे कण जातात त्यामुळे अपघात होतात. आणि
अतिभार वाहतुकीमुळे संपूर्ण रस्ता चाळणी झालेला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणारे दुचाकी वाहने . शेतकऱ्यांची वाहने. ठिकठिकाणी पिकांची वाहतूक करण्याकरिता वापरण्यात येणारे ट्रॅक्टर खड्ड्यामध्ये अडकून व पलटून शेतकऱ्याच्या शेतीमालाचे नुकसान झालेले आहे. होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे.
🔥वाहतूक परिवहन अधिकारी (R.T.O ) यांचे दुर्लक्ष.
वर्धा जिल्ह्याचे राज्य परिवहन अधिकारी वाहनांची तपासणी करण्याकरिता देवळी परिसरामध्ये येतात पण त्यांना ओव्हरलोड कोळशाची वाहने का दिसत नाही त्यांच्याकडे ते जाणून-बुजून पाठ का फिरवत आहे ? अशी लोकांमध्ये चर्चा आहे . परिवहन अधिकाऱ्यांनी कोळशाची ओव्हरलोड करणाऱ्या गाड्यांवर तातडीने कारवाई करून होणारे अपघात टाळावे अशी मागणी देवळी परिसरातील नागरिक करीत आहे.
🔥प्रदूषणकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. इंजिनीयर अशोक राऊत. शेतकरी तथा विरोधी पक्षनेता नगर परिषद देवळी.
देवळी औद्योगिक वसाहत व देवळी रेल्वे डम्पिंग यार्ड मधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत असून त्याच्या परिणाम लोकांच्या आरोग्यावर तसेच शेत पिकांवर होत आहे. प्रदूषण मुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला असून आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने हा एक प्रकारे मनुष्यांना हळूहळू मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा काम सुरू आहे .त्यामुळे अशा लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
मागण अशी मागणी देवळी नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्ष नेते इंजिनीयर अशोक राऊत यांनी केली आहे.
********************
🔥धुळीचे आरोग्यास घातक डॉ. दीपक कोल्हटकर माजी वैद्यकीय अधिकारी देवळी
देवळी परिसरातील येणारे रुग्ण दमा, छातीचे त्रास, घशाचे त्रास ,डोळ्याचे त्रास या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे याचे कारण कोळशातून निघणारे कार्बन मोनो ऑक्साईड श्वास घेताना छातीत जाऊन गोळा होतात त्यामुळे छाती दुखण्याचे प्रकार घसा दुखण्याचे प्रकार व प्रामुख्याने लंग कॅन्सर होण्याची होण्याची शक्यता आहे , तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळून येत आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची दक्षता घेण्याकरिता गरज आहे . त्यामुळे देवळी परिसरातील प्रदूषण त्वरित थांबविण्याची गरज आहे. डॉ.दीपक कोल्हटकर यांनी असे मत व्यक्त केले आहे . ******************** 🔥धुळीच्या कणामुळे पिकांना पोषक घटक मिळत नाही. मोहन जोशी. धुळीने त्रस्त शेतकरी देवळी. धुळीचे कण पिकाच्या पानावर जमा होत असल्याने पिकाला मिळणारे अन्यद्रव्य घटक मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटते होते तसेच कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे शेतकऱ्याची वाहतूक असलेला रस्ता खड्डेमय झाला आहे. कोळशाचे ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करावी तसेच साचलेल्या धुळीच्या कणाचा चारा मुक्या जनावराच्या पोटामध्ये जात असल्याने त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. असे मत मोहन जोशी यांनी व्यक्त केले आहे. ********************”*** 🔥कोळशाच्या धुरामुळे शेती व जनावरांच्या आरोग्यावर विक्रीत परिणाम, विठ्ठल लाडेकर धुडीने त्रस्त शेतकरी देवळी. माझ्याकडे पशुपालन व्यवसाय व शेती आहे. कोळशाचा धूर जनावरे खात असलेल्या गवतावर पळत असल्याने जनावरांचा चारा दूषित झालेला आहे. जनावरे कोळशाचे धूळ पडलेले गवत खात असल्याने त्यांच्या पोटामध्ये धुळीचे कण जात असल्याकारणाने जनावरे आजारी पळण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नियमित त्यांना औषध उपचार करावा लागत आहे आणि जनावराची दूध देण्याची क्षमता कमी झालेली आहे याचा परिणाम माझ्या दुग्ध व्यवसायावर झालेला आहे तसेच शेती सुद्धा या धुरामुळे अडचणीत आलेली आहे यावर त्वरित तोडगा काढणे व उपाययोजना करणे गरजेचे आहे असे मत शेतकरी विठ्ठल लाडेकर यांनी व्यक्त केले. (क्रमशः)