अपघातामध्येदुचाकीचा चेंदामेंदा होऊन,दोघे गंभीर जखमीथार ते आष्टी मार्गांवर घडली घटना.
आष्टी शहीद -/आष्टी तालुक्यातील थार येथील शेतकरी बाल्या कामडी व प्रकाश जावंळेकर यांच्या शेताला लावून असलेल्या सौर कुंपण व बॅटरी चोरून आष्टी च्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात दि. ३१जुलै रोजी रात्री १०वाजता आष्टी ते थार रोडवर घडला. यां अपघातात दुचाकी वर स्वार दोघेही गंभीर जखमी झाल्याची चर्चा आष्टी पोलिसात व थार गावात सुरु आहे.
सविस्तर असें कि,
आष्टी तालुक्यातील थार येथील रहिवाशी हा आष्टी येथे सूर्या इलेक्ट्रिक मेक्यनिकाल चे दुकान चालवीत असून तो सौर कुंपण साहित्य बनवून विकण्याचे काम करतो. याने थार गावात यापूर्वी बॅटरी साहित्य विकून तेच साहित्य चोरून नेले होते. शेतकरी प्रकाश जावळेकर यांनी दुसऱ्या दिवशी दुकानात गेल्यावर साहित्य ओळखलं आणि हे साहित्य दुकानात आले कसे म्हणून चर्चा केली होती. पुन्हा याचा दुकानातून बॅटरी व सौर प्लॅट व साहित्य विकत घेतले आणि शेताला लावून दिले. दि. ३१जुलै रोजी थार रोडवर असलेल्या शेतात बाल्या कामडी व प्रकाश जावळेकर यांनी बॅटरी चा करंट चालू करून घरी गेले आणि शेतात आले तर बॅटरी यां चोरी गेल्या होत्या. शंका आली म्हणून यां दोघांनी आष्टी च्या दिशेने पाठलाग केला मात्र यां दोन्ही शेतकऱ्यांना काही दिसलें नाही. तर त्याच दिवशी थार गावातील काही मजूर हे माणिकवाडा गावात कामाला गेले आणि परतीच्या वेळी यां मजुरांना थार जंगलात ओळख असलेल्ले दुचाकी स्वार दोघेही चोरटे गंभीर जखमी अवस्थेत मदतीची याचना करित होते. मजुराणी जखमी ना वाचावायचे म्हणून चार चाकी वाहणात टाकून ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचारासाठी भरती केलें. प्रकुती आवक्याबाहेर असल्यामुळे जखमी दोघांनाही अमरावती येथे ऍम्ब्युलन्स नें नेण्याची व्यवस्था केली. ही वार्ता थार गावात येताच गावकरी यांनी अपघात ठिकाण गाठले तेव्हा आजू बाजूला पाहणी केली तेव्हा दोन बॅटरी व दोन प्लॅट व बरेच काही साहित्य एका झाडाखाली लपवून असल्यामुळे निदर्शनास आले. पाहणाऱ्या शेतकऱ्यांनि साहित्य ओळखले आणि आष्टी पोलिसांना यां घटनेची माहिती दिली. बाल्या कामडी व प्रकाश जावंळेकर यांनी चोरीला गेलेल्या शेती साहित्यची तक्रार नोंदविली.पुढील तपास आष्टी पोलीस करित आहे.शेती साहित्य चोरणारी टोळी ही परिसरात तील असून पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे आता पुढे आले आहे.