श्रीक्षेत्र परसोडा येथे तालुका स्तरीय ग्रामजयंतीचे भव्य आयोजन

0

🔥श्रीक्षेत्र परसोडा येथे तालुका स्तरीय ग्रामजयंतीचे भव्य आयोजन.

🔥२५ एप्रिल रोजी “जन्मोत्सव सोहळा” सुध्दा होणार उत्साहात साजरा.

आष्टी/(शहीद,प्रतिनिधी-नरेश भार्गव)-/ आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र परसोडा येथे दिनांक २५ एप्रिल रोजी तालुका स्तरीय ग्रामजयंतीचे आयोजन करण्यात आले असुन सोबतच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भव्य जन्मोत्सव सोहळा सुध्दा होऊ घातला आहे.या कार्यक्रमाचे आयोजन आष्टी तालुका श्री गुरूदेव सेवा मंडळाचे मार्गदर्शक व सल्लागार समिती कार्यकारिणीचे वतीने करण्यात आले आहे.त्यामुळे आष्टी तालुक्यात अती उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरवात दिनांक २४ एप्रिल पासुन होत आहे. दिनांक २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थना होऊन रात्री ८.३० ला तारासावंगा येथील ह. भ. प. विनायक महाराज कावळे यांचे राष्ट्रीय कीर्तन होईल.दिनांक २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता ग्रामसफाई झाल्यानंतर सामुदायिक ध्यान होईल आणि सकाळी ७ वाजता आष्टी तालुक्यातील विविध गावांवरून आलेल्या पालख्यांची आणि भजनी दिंडी शोभायात्रा यात्रा निघेल.सकाळी १०.३० वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा भव्य जन्मोत्सव सोहळा होईल.दुपारी १२.३० वाजता साहुर येथील प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. गजानन महाराज भोरे यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन होईल.दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या संपुर्ण ग्रामजयंती महोत्सवात श्री गुरूदेव सेवा मंडळाचे मार्गदर्शक आणि सल्लागार समिती उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला समाजप्रबोधनाचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. त्यांच्या विचारांचा प्रसार करून समाजात एकता, बंधुता व सेवा भावना वृद्धिंगत करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी परीसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आष्टी तालुका श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या मार्गदर्शक व सल्लागार समितीचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!