सेवाग्राम, तुळजापूर -/सामुदाईक वैद्यकीय विभाग सेवाग्राम च्या माध्यमातून सामुदाईक वैद्यकीय विभागच्या सभागृहात तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणार्या सर्व गावातील ग्रामीण आरोग्य पाणी पुरवठा व स्वछता समितीच्या अध्यक्ष सचिव आनी सभासदांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला संबोधित करताना विभाग प्रमुख या नात्याने बोलत असताना डॉ सुभोध गुप्ता म्हणाले कि सद्याच्या पालकांनी मुलांच्या लहान वयापासून
मुलांच्या खाण्याच्या सवयी बाबत दक्ष असलं पाहिजे कुरकुऱ्याचे पॉकेट फिझा बर्गर मन्चुरन या गोष्टी देण्या एवजी फळ देता येईल घरचे साधे जेवण मुलांना चारता येईल का एवढे तुला खावेच लागेल असं न म्हणता नैसर्गिक रित्या भूख लागल्यावर आपण जेवण घेतले पाहिजे या गोष्टी आयुष्यात उत्तम आरोग्य ठेवण्या करिता गरजेच्या आहे असे ते म्हणाले
यावेळी जवळपास पंचवीस गावातील आशा अंगणवाडी आणि सभासद उपस्थिती होते तसेच यावेळी डॉ बादल सर यांनी डिपार्टमेंट मधील चालत असलेल्या सर्व प्रकलपाची माहिती दिली सर्व सभासदांना आपले गाव कसे अपेक्षित आहे याचे स्वप्न बघून ते सत्यात कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रवीण भुसारी यांनी केले तर आभार चंदा भोंडवे यांनी मानले
कार्यक्रमाला डॉ अभिषेख राऊत डॉ नवीन डॉ तेजश्री क्षीरसागर व्ही कॅन टीम इलाईट प्रकल्प टीम सर्व उपस्थित होते.