सरकारनी नशीले पदार्थांचा व्यापार बंद करावा,मेधाताई पाटकरांचा,खुर्ची छोडो आंदोलन इशारा….

0

वर्धा -/ ८२ व्या छोडो भारत आंदोलनाच्या पूर्व संध्येला.८ऑगष्ट रोजी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सायंकाळी ५ वा.च्या सुमारास मुंबई येथील मालाड मधील आंबेडकर चौक परीसर पटांगणात झालेल्या श्रमिक जनता संघ,व घर बताओ,घर बनाओ मंचाचे वतीने आयोजित हजारो महिला व कामगारांचे उपस्थित मेळाव्यात राज्य तसेच केंद्र सरकारने कोट्यावधी महिलांचे सुखी संसार उध्वस्त करण्यासाठी,त्यांचे नवरे व पोरांना दारु,गांजा, चरस,कोकेन आदि नशीले पदार्थाची व्यसने लावून जिवंत मारीत आहे.करीता या सरकारांनी राज्यात व देशात या अंमली पदार्थांवर संपूर्णपणे बंदीचा सक्त शिक्षेचा कायदा त्वरीत करावा,अन्यथा १९४२ मधे इंग्रजांना ” छोडो भारत “चा शेवटचा इशारा दिला व देशभर आंदोलन केले, त्याप्रमाणे महिलांचे नेतृत्वात सध्याचे सरकारांना खुर्ची तोडो आंदोलन करण्याचा इशारा दिला.भारतीय राज्य घटनेचे परिच्छैद ४७ मध्ये मादक द्रव्य दारु वर पूर्णपणे बंदी करण्याचे नमुद आहे,तसेच महाराष्ट्रा मधे मुंबई दारु बंदी कायदा होता,तो महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पुढाय्रांचे दारु कारखान्यातील दारु विकण्यासाठी, महाराष्ट्र राज्यात दारु मुक्त करण्यात आली,युतीचे सरकारने १८००० दारु दुकानांना परवाने दिलेत, मद्ययुक्त महाराष्ट्र राज्य बनविले,व महिलांचे संसार उध्वस्त करण्याचे कारस्थान केले. हे महिला विरोधी धोरण सरकारने मागे घ्यावे,असे जाहिर आवाहन या मेळाव्यात केले.आज महाराष्ट्रातील ३कोटी महिला युति सरकारच्या दारु धोरणामुळे वैतागलेल्या आहेत,त्यांचेवर प्रचंड अत्याचार वाढलेत,दारु पिवून वाहने चालवून रस्त्यातील निरपराध हजारो पांस्थस्तांना वाहनांनी चिरडून मारण्यात येत आहे. करीता दारु बंदी कायदा करण्यात यावा. अन्यथा त्याविरुद्ध महिलांना रस्त्यावर लढ्यासाठी उतरावे लागेल,असा खणखणीत जाहिर इशारा या मेळाव्यात दिला. या मेळाव्यात किसान संघर्ष समितीचे अखिल भारतीय नेते डॉ.सुनिलम् यांनी केंद्र सरकारने शेतमालास एम.एस.पी.चे दुप्पट भाव देण्याचा कायदा करण्याची मागणी मेळाव्यात केली. सफाई कामगारांना कायम करुन,समान वेतन कायदा करण्याची मागणी सफाई कामगार संघटनेचे सचिव जगदीश खैरालिया यांनी मागणी केली,मेळाव्यात देशातील मान्यवर नेते सर्वश्री फिरोज मिठीबोरवाला,कृपाशंकर सिंग,रिझवान शेख,अनिशा शेख, यांची भाषणे झालीत.मैळाव्याचे संचालन घर बनाओ,घर बताओ घ्या कार्यकर्त्या पुनम कनौजियाने केले. दिनांक ९ऑगष्ट रोजी मेधाताई पाटकरांचे नेतृत्वात श्रमिक महिला,व कामगारांचे हितासाठी, संविधान बचाओ,देश बताओ रैली मरीन ड्राईव्ह ते क्रांति मैदानात काढण्यात आली. दारु मुक्ती आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत, कोल्हापूर घ्या सुजाता ताई देसाई, गडचिरोली च्या आदिवासी नेत्या कुसूमताई आलम यांनी मेधाताई पाटकर आईंना फोनद्वारे पाठींबा दिला.व राज्यातील व्यसनमुक्ती करीता महाराष्ट्र भर जन आंदोलनात सहभागी होण्याचे कळविले.

साहसिक news -24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!