हाच तो, घाट ईथे जलद डिझल बोटीने होत आहे वाळू उपसा.व प्रशासनिक अधिकारी कुंभकर्णी झोपेत.
देवळी /तालुक्यातील सातीपोटी व कोटेश्वर मंदिर घाटावर अवैधरित्या वाळू चे उत्खनन जोरात सुरू आहे.या वाळू चे उत्खनन जलद बोटीने करण्यात येत आहे आणि शेकडो टिप्पर वाळूचे या वाळू घाटावर अवैद्य वाळूचे उत्खनन करून काढण्यात येत आहे.वर्धा जिल्हा व यवतमाळ जिल्हात या दोन घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध पुरवठा वाळू तस्कर करीत आहे.वाळू तस्करांची हिंमत इतकी वाढली आहे की भर दिवसा तहसील व पोलीस स्टेशन समोरून अवैध्यरित्या वाळू तस्करांची वाहनाची रेल-चेल होत आहे. स्थानिक प्रशासनिक अधिकारी अश्या कुंभकर्णी झोपेत आहे की त्यांना अवैध्य वाळूचे वाहन दिसतच नाही यावरून असे लक्षात येते की प्रशासनिक अधिकारी व वाळू तस्कर यांची साटेलोट असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत नाही अशी लोकांमध्ये चर्चा आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये तसेच अलीकडच्या काळामध्ये देवळी तालुक्यातील प्रशासनिक अधिकाऱ्यांनी काही रेतीचे ट्रॅक्टर व टिप्पर पकडून प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली पाठ थोपाटून घेतली परंतु हे प्रशासनिक अधिकारी देवळी तालुक्यातील मोठ्या वाळू तस्करांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का करीत आहे.असा प्रश्न लोकांमध्ये चर्चेला जात आहे. या मोठ्या वाळू तस्करांना मोठया राजकीय नेत्यांचा आशीर्वाद प्राप्त असल्यामुळे प्रशासनिक अधिकारी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे.देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खुलेआम अनेक घाटावर वाळू तस्करी सुरू असतांना त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे वाळू तस्करांचे हौसले बुलंद झालेले आहे.तालुक्यातील सातीपोटी व कोटेश्वर मंदिर घाट या घाटांवर रात्रभर जलद डिझेल बोटीने वाळू उपसण्याचे काम जोरात सुरू असते आणि दिवसभर वाळूची अनेक वाहनाद्वारे जिल्ह्यात व पर जिल्ह्यात अवैध वाळूचा पुरवठा केला जातो.या घाटांवरून होत असलेल्या अवैध वाळू उपसामुळे या भागातील पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल सुद्धा बुडत आहे परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही तरीही शासनाने या वाळू घाटांवरून होत असलेल्या अवैध वाळूचा उपसा त्वरित बंद करावा तसेच वाळू तस्करांच्या मुसक्या आवराव्या आणि दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देवळी तालुक्यातील समस्त नागरिक करीत आहे.