🔥सायबर गुन्ह्यांच्या तपासातही संदीप कापडे यांची दमदार कामगिरी!
वर्धा -/ सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे हे सध्या सायबर गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, तांत्रिक पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण आणि तपासातील अचूकता यांच्या जोरावर त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हेगारांचा माग काढताना तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून तपासाला योग्य दिशा देण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष ठरत आहे.
गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा मिळवून देणाऱ्या त्यांच्या पूर्वीच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर वर्धा जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांच्या तपासातही कापडे यांची प्रभावी कामगिरी सुरू आहे. त्यामुळे आगामी काळातही त्यांच्या तपास कौशल्यातून आणखी अनेक गुन्ह्यांची उकल होऊन नागरिकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(क्रमशः)