🔥साहुर गावात पाण्यासाठी जनावरांना मरण यातना,एक महिन्यापासून मोटार नादुरुस्त,साहुर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.
साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर येथे गेल्या एक महिन्यापासून जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने मरण यातना सहन कराव्या लागत आहे साहुर परिसरातील नदी नाले खोलीकरण झाल्याने जनावरांना नदीतील पाणी पिता येत नाही जर पाणी पिण्यासाठी जनावरे नदीत गेली तर गाळामध्ये फसतात जंगलातील ओढ्यांना पाणी नसल्याने जनावरांना मरण यातना सहन कराव्या लागत आहे परंतु याकडे मात्र साहुर ग्रामपंचायत पुर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे मत येथील गुराख्यांनी व्यक्त केले गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायतला वारंवार माहिती देऊन सुद्धा सार्वजनिक जनावरांचे पिण्याचा हौद भरत नसल्याने गुराख्यासह पशुपालक आक्रमक झाले आहेत गेल्या एक महिन्यापासून मोटार नादुरुस्त असल्याचे कारण सांगत जनावरांचा जीव धोक्यात आला आहे जर ग्रामपंचायतीच्या वतीने दोन दिवसांत पाण्याची सोय झाली नाही तर गुराखी मात्र गावगव्हण चारणे बंद करून सर्व गावगव्हण चारण्याची जबाबदारी ग्रामपंचायत कडे देणार असल्याचे सांगितले दिवसेंदिवस साहुर गावातील पाळीव जनावरांची संख्या अत्यंत कमी होत असुन पशुपालक सुद्धा संकटात सापडले आहेत त्यामध्ये ग्रामपंचायत कडुन सुविधा मिळत नसल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत हे विशेष