खडकी गावातील घटना..हाच तो पुढारी नेता सुरेश नागपुरे स्वतःच कंत्राटदार असल्याचा सांगून पोलीस पाटील ला शिवीगाळ करून अपमानित करणारा.
आष्टी शहीद -/खडकी येथे सिमेंट रस्ता कामावरून दोन गटात वाद निर्माण झाला.अपूर्ण काम पुर्ण करा व कामात रेती वापरा डस्ट वापरू नका म्हणून शंभूशेष महाराज ट्रस्ट यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला.झालेल्या वाद मिटवा म्हणून पोलीस पाटील गेले असता तेव्हा त्यांना गावं पुढारी सुरेश नागपुरे यांनी शिवीगाळ करित अपमानित केले.यां घटनेचा व्हिडीओ वायरल होताच तालुक्यातील गावात चर्चेला ऊत आला होता.आष्टी तालुक्यातील खडकी येथे आमदार दादाराव केचे यांच्या निधीतुन २५ लाखाचा निधी सिमेंट रस्ता कामाकरिता देण्यात आला.हा रस्ता शंभूशेष महाराज समाधी पर्यंत निर्माण करावा म्हणून गावातील शंभूशेष महाराज ट्रस्ट चि पाहिलेपासून मागणी होती.खडकी गावातील गावं पुढारी यांनी हा रस्ता अपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला यावरून कामाला सुरवात होणार हे पाहून ट्रस्ट चे सदस्य यांनी निर्माण होणारा रस्ता हा मंदिरापासून सुरु करा असा आग्रह धरला.येथे शाब्दिक वाद सुरु असताना पोलीस पाटील मंगेश नागपुरे यांना मध्यस्ती करण्यासाठी बोलविले तेव्हा गावं पुढारी सुरेश नागपुरे यांनी मीच ठेकेदार म्हणून मध्यस्ती करणाऱ्या पोलीस पाटील मंगेश नागपुरे याला शिवीगाळ करून अपमानित केलें. झालेला प्रकार एका नागरिकांने कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा गावं पुढारी सुरेश नागपुरे यांनी दादागिरी चि भाषा बोलून दाखविली.ही घटना ३१ मे रोजी दुपारी १० वाजता खडकी गावात घडली.पोलीस पाटील यांना भर चौकात शिवीगाळ केली यां कारणावरून पोलिसांना तक्रार देण्यासाठी गावकरी व सुरेश नागपुरे यांच्यावर कार्यवाही व्हावी म्हणून तक्रार करणार असल्याचे गावकरी यांनी सांगितले.