“सुमित वानखेडेंचे समाजसेवी जन हितार्थ कार्य वाखाणण्याजोगे,हाजी शेख अमीरभाई…

0

🔥महायुती सरकारचे बिना भेदभाव कार्य उल्लेखनीय आणि उत्कृष्टच,हाजी शेख अमीरभाई.

आष्टी शहीद -/ महायुती सरकारचे बिना भेदभाव हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध सर्व समाजाच्या घटकांना बिना भेदभाव प्रत्येक महिलांना ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतंर्गत दिलेला लाभ कौतुकास्पद आहे. याबद्दल महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानतो. सुमित वानखेडे यांच्या कार्याप्रती मी प्रभावित झालो आहोत. समाज हितार्थ, जन हितार्थ जनतेला भेडसावणाऱ्या समस्या कायमच्या सोडवण्यासाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. येणाऱ्या दिवसात सुमित वानखेडे सारखा लोकप्रतिनिधी जर मिळत असेल तर विधानसभेतील लोकांचे भाग्यच असे उद्गार मुंबईचे जनाब हाजी शेख अमीरभाई यांनी आष्टी तालुक्यातील नवीन अंतोरा येथील हनुमान मंदिर मैदानात ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना काढले.नवीन अंतोरा येथे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार प्रसार व संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला सुमित वानखेडे भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हाजी शेख जमील शेख मुंबई शेख अमीरभाई मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीसह कमलाकर निंभोरकर आष्टी तालुका अध्यक्ष भाजपा, अशोक विजयकर महामंत्री भाजपा, सचिन होले, रामदास लव्हाळे, प्रमोद कापसे, डॉ. नरेंद्र देशमुख, देविदास पाथरे, कृष्णा इंगळे,ॲड. जयंत जाणे, ॲड.मनीष ठोंबरे, अनिल मानकर, सतीश काळे, महेंद्र गौरखेडे, हनुमंत कुरवाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.सुमित वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की, पाऊस सुरू असतांना देखील महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय आहे असे म्हणत तुमच्या कोणत्याही सुखदुःखात तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी मी कायमच उभा राहील. महायुतीचे सरकारचे धोरण सर्वसमावेशक असुन समाजातील प्रत्येक घटकांना शासनाचा लाभ हा बिना पक्षपात, बिना भेदभाव सर्वांना मिळतो याचेच मुर्तिमंत उदाहरण ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आहे. या योजनेचा सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. काही भगिनींच्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक नसल्याने पैसे जमा झाले नसल्यास आधार कार्ड बँक खात्या सोबत सिडींग करून घ्यावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश पांडे यांनी केले. पाऊस सुरू असतांना देखील या कार्यक्रमाला अंतोरा जुना , नवीन अंतोरा, माणिनगर येथील असंख्य महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती.

नरेश भार्गव साहसिक news-24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!