आर्वी -/येथे ५ जानेवारी रविवार रोजी आर्वी विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार सुमित दादा वानखडे यांना सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राड्डादार संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांना नियमाप्रमाणे कामापासून वंचीत ठेवण्यात येत आहे ज्या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना लायसन्स देण्यात आले होते त्या उद्देशाची पायमपल्ली करत अधिकारी वर्ग त्यांना कामापासून वंचित ठेवत आहे.सर्व सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांनी दिलेल्या निवेदन मधे म्हटले आहे की शासकिय नियमानुसार ४०% कोटा हा सुशिक्षीत बेरोजगारांना असतांना आम्हाला नियमानुसार गेली ५ वर्षापासुन कामापासून वंचीत ठेवण्यात येत आहे. २) शासकिय नियमानुसार सुशिक्षीत बेरोजगारांना लॉटरी पध्दतीने काम वाटप हे गेल्या ५ वर्षापासून झालेले नाही. ३) तसेच आर्वी विधानसभा अंतर्गत जि.प. बांधकाम विभाग, पं.स. तसेच वनविभाग, कृषी विभाग, निम्न वर्धा प्रकल्प इत्यादी विभागामध्ये सुध्दा सुशिक्षीत बेरोजगार यांना आजपर्यंत काहीच कामे देण्यात आलेले नाही . त्यामुळे शिक्षक वर उपासमारी ची वेळ आलेली आहे करीता आंम्हा सुशिक्षीत बेरोजगारांचा विचार करून शासकिय नियमानुसार सा.बां. विभाग आर्वी अंतर्गत कामे वाटप व्हावी हि विनंती सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे रूपचंद घोडेश्वर, अशोक विजय कर,अमित बिरोले ,सोहेल शेख, नारायण लायच्या, मोहम्मद शहादा, अकबर खान ,दर्शन भट्टड, मिलिंद गणेशकर ,शुभम चांडक ,भगवान ठाकूर ,विजय लांबाडे, अभिजीत वाघमारे, राजेश गोरे, प्रतीक केचे इत्यादी सुशिक्षित बेरोजगार उपस्थित होते.