सेलू पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.! गहाळ १३ मोबाईलचा शोध; प्रजासत्ताक दिनी तक्रारदारांना परतावा…

0

🔥सेलू पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.! गहाळ १३ मोबाईलचा शोध; प्रजासत्ताक दिनी तक्रारदारांना परतावा.

 सेलू -/ येथील पोलीस स्टेशन हद्दीत मागील वर्षभरात गहाळ झालेल्या मोबाईल प्रकरणी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हरवलेल्या १३ मोबाईलचा शोध लावण्यात यश मिळवले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व मोबाईलचा तक्रारदारांना सन्मानपूर्वक परतावा करण्यात आला.
यामध्ये मनोज भांडेकर रा. वडगांव(खुर्द) यांचा अंदाजे १५ हजार रुपये किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल, तसेच कैलास मांढरे रा. वॉर्ड नं. ४, सेलू यांचा अंदाजे १६ हजार रुपये किंमतीचा ओपो मोबाईल यांचा समावेश आहे. यासह इतर ११ तक्रारदारांचे गहाळ मोबाईलही शोधून परत करण्यात आले आहेत.
मोबाईल गहाळ झाल्यानंतर अनेक नागरिक आशा सोडून देतात; मात्र सेलू पोलिसांनी तक्रारींचा सातत्याने पाठपुरावा करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही यशस्वी कारवाई केली. नागरिकांमध्ये यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कामगिरीत ठाणेदार देवेंद्र ठाकूर तसेच पोलीस अंमलदार ज्ञानदेव वनवे यांनी मोलाची भूमिका बजावली.
सेलू पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत असून, पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

सचिन धानकुटे साहसिक News-/24 सेलू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!