सेलू शहरात रमजान ईद उत्साहात साजरी इदगाह मैदानात मुस्लिम बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती..

0

🔥सेलू शहरात रमजान ईद उत्साहात साजरी.
इदगाह मैदानात मुस्लिम बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती

सेलू  – / शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी इदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज अदा करण्यात आली. नमाजानंतर एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देण्यात आल्या. शहरात बंधुभाव आणि ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कोटंबकार यांनी इदगाह मैदानावर उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्व समाजांनी परस्परांतील सलोखा जपत सण-उत्सव एकोप्याने साजरे करावेत, असे आवाहन केले.

ईदच्या निमित्ताने शहरातील विविध भागांत आनंदाचे वातावरण होते. लहान मुलांनी नवीन कपडे परिधान करत उत्साह व्यक्त केला. तसेच अनेकांनी एकमेकांच्या घरी जाऊन गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेत सणाचा आनंद द्विगुणित केला.

     चैताली गोमासे साहसिक          News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!