🔥६९ रक्तदात्यांचे रक्तदान, आगामी संघ शताब्दी वर्ष उपक्रम,सेवा विभाग व आरोग्य भारती वर्धाचे सहयोग.
वर्धा -/ स्थानिक तात्या कुलकर्णी सभागृह, सर्कस ग्राऊंड, रामनगर वर्धा येथे आगामी संघ शताब्दी वर्षानिमित्त स्व. आप्पाजी जोशी स्मृती सेवा न्यास द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन दि. ९/२/२०२५ ला करण्यात आले होते. यात शंभर पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. यात ६९ लोकांचे रक्तदान दत्ता मेघे रक्त पेढी व डॉ. हेगडेवार रक्त पेढी यांनी रक्त स्विकारले. अन्यांना वैद्यकीय कारणास्तव अस्वीकाहार्य केले.
सदर कार्यक्रमास वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सदिच्छा भेट दिली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, शहराध्यक्ष निलेश पोहेकर, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, युवा मोर्चा अध्यक्ष वरुण पाठक, राम मंदिर प्रमुख संजय लाभे, विजय धाबे आदी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगर संघचालक तथा सेवा न्यासाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देशमुख यांनी दिप प्रज्वलन व भारतमाता यांची प्रतिमा पूजन करुन केले. यावेळी आरोग्य भारतीचे अध्यक्ष अंकुश कावलकर व सेवा विभागाचे अनुप भोयर हे उपस्थित होते. दत्ता मेघे रक्त पेढी व डॉ. हेगडेवार रक्त पेढी तर्फे आलेले डॉक्टर अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांच्या हस्ते ‘भविष्य का भारत, राष्ट्रीय स्वयंसेवक का दृष्टीकोनÓ हे पुस्तक देऊन सक्तार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थचे सर्व सदस्य तसेच सर्व स्वयंसेवक बंधूंनी सहकार्य केले. शिबिरास परिसरातील महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.