स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने श्रीराम दरबार आणि जगदंब ढोल ताशा पथकाच्या सदस्यांनी १२१ झाडांची लागवड केली..

0

वर्ध्याच्या विविध शासकीय जागांवर राबविला अभिनव उपक्रम.

वर्धा -/ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, वर्धेती युवकांनी एक अभिनव उपक्रम राबवत श्रीराम दरबार आणि जगदंब ढोल ताशा पथकाच्या सदस्यांनी संयुक्तपणे संपूर्ण वर्धेतील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण अभियान राबवले.या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे २५० झाडांची लागवड करण्यात आली.यात वर्धेतील श्रीराम दरबार व जगदंब ढोल ताशा पथक च्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेऊन या अभियानाला यशस्वी केले.आणि एक वेगळ्या पद्धतीने निसर्ग संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला.तसेच या वृक्षारोपणाने परिसरातील हरित क्षेत्र वाढवण्यास मदत होईल व जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची भावना जागृत होईल तसेच येणाऱ्या पिढ्यांसाठी एक हरित वारसा निर्माण होईल असे जगदंब ढोल ताशा पथक चे प्रमुख उज्वल ठाकरे यांनी म्हटले.तसेच या अभियानात सहभागी झालेल्या सर्व सामाजिक संस्थांचे व त्यांच्या सदस्यांचे आभार मानून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने श्रीराम दरबार आणि जगदंब ढोल ताशा पथकाच्या सदस्यांनी १२१ झाडांची लागवड केली.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!